World

अफगाणिस्तान स्फोटांनी हादरले

80 जण ठार, 200 जण जखमी

80-died-200-injured-at-afghanistan-airport-blast

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सायंकाळी एकापाठोपाठ एक झालेल्या दोन (Afghanistan Airport Blast) बॉम्बस्फोटात 80 जण ठार झाले. तर 200 जण जखमी झाले. अमेरिकेतील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात अमेरिकेच्या बारा मरिन कमांडों मृत पावले असल्याचा संशय आहे.

काबूल विमानतळाबाहेर साडेसातच्या सुमारास इसीसच्या दहशतवाद्यांनी हा आत्मघाती हल्ला केला आणि लागोपाठ दोन बॉम्बस्फोट झाले. अमेरिका आणि ब्रिटनने नुकतीच काबूल विमानतळावर (Afghanistan Airport Blast) दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्‍त केली होती. या स्फोटांत 80 जणांना प्राण गमवावे लागल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये अमेरिका, ब्रिटन आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांचा समावेश आहे.

विमानतळाजवळील बैरन हॉटेलच्या शेजारी हा स्फोट झाला. या घटनेनंतर काबूल एअरपोर्टवरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. हल्लेखोर गोळीबार करत विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ आला आणि स्वतःला बॉम्बने उडवून दिले. विमानतळाच्या एबी गेटवर ही घटना घडली. दुसरा आत्मघाती हल्ला विमानतळाच्या समोर असलेल्या हॉटेलमध्ये झाला. एबी गेटपासून जवळच हे हॉटेल आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांना या हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत अमेरिकेचे बारा मरीन कमांडो ठार झाल्याची माहिती आहे. एअरपोर्टवरही सतत गोळीबार सुरू असल्याचे समजते. या स्फोटांत अनेक अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र प्राथमिक वृत्तानुसार मृतांची संख्या 60 इतकी असल्याचे कळते. या स्फोटामुळे विमानतळाबाहेर जमलेल्या नागरिकांची पळापळ झाली.

तालिबान्यांनी अफगाणिस्तान (Afghanistan Airport Blast) काबीज केल्यापासून अफगाणिस्तानात गोंधळाचे वातावरण आहे. अनेक नागरिक देश सोडून बाहेर जात आहेत. त्यामुळे गेले आठवडाभर काबूल विमानतळाबाहेरची गर्दी कायम आहे. अमेरिकन लष्कर आणि नाटोच्या सैन्याच्या नियंत्रणाखाली काबूल विमानतळावरील उड्डाणे होत आहे.

अमेरिकेसह अनेक देशांनी लष्करी आणि नागरी विमानसेवेच्या माध्यमांतून आपल्या नागरिकांना परत आणण्याला प्राधान्य दिले आहे. तथापि, विमानतळावर इसीसकडून दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्‍त केली होती. त्यानुसार अमेरिका आणि ब्रिटनने आपल्या नागरिकांना विमानतळावर गर्दी न करता पुढील सूचना मिळेपर्यंत सुरक्षितस्थळी थांबवण्याची सूचना केली होती. या पार्श्‍वभूमीवर विमानतळाशेजारी हे स्फोट झाले. त्यामुळे गुप्तचर यंत्रणाची माहिती खरी ठरली आहे.

स्फोटानंतर अनेक मृतदेह विमानतळाशेजारील मोठ्या गटारात पडल्याचे आढळून आले. काही जखमीही त्याच ठिकाणी पडले होते. बचावलेले अनेकजण या गटारात आपल्या आप्‍तेष्टांना शोधत होते. दरम्यान, तालिबानच्या प्रवक्त्यानेही हा दहशतवादी हल्ला असल्याचे मान्य केले. मात्र मृतांची संख्या फक्‍त 15 इतकीच असल्याचा दावा त्याने केला.

अफगाणिस्तानच्या (Afghanistan Airport Blast) 100 नागरिकांना घेऊन जाणार्‍या जर्मनीच्या विमानावर गुरुवारी सायंकाळी काबूल विमानतळावर गोळीबार झाला. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हा गोळीबार झाला. सुदैवाने या गोळीबारात विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. अथवा जीवितहानीही झाली नाही. अफगाणिस्तानच्या नागरिकांनी देशाबाहेर जाऊ नये, असे फर्मान तालिबान्यांनी सोडले आहे. या विमानातील सर्व प्रवासी अफगाणिस्तानचे होते. त्यामुळे गोळीबार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पहिला स्फोट झाल्यानंतर अफगाणिस्तानातील फ्रान्सच्या राजदूतांनी आणखी एक स्फोट होण्याची शक्यता असल्याचे ट्विटरवरून वर्तविली होती आणि थोड्याच वेळात दुसरा स्फोट झाला. दरम्यान, ईसीसने साखळी बॉम्बस्फोटाचा कट रचला असून आणखी काही स्फोट होऊ शकतात, अशी शक्यता अमेरिकेच्या माध्यमांनी वर्तविली आणि हे वृत्तही खरे ठरले.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button