Travel

World Photography Day 2021 : जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त पर्यटन संचालनालयामार्फत फोटोग्राफी स्पर्धा

फूड फोटोग्राफी, ट्रॅव्हल फोटोग्राफी, कथाकथन यावर ऑनलाईन कार्यशाळा

world-photography-day-2021-photography-competition-by-the-directorate-of-tourism-on-the-occasion-of-world-photography-day

मुंबई : जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त (19 ऑगस्ट) नवोदित (World Photography Day 2021) आशय निर्मात्यांना एकत्र आणण्यासाठी आणि महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने (DoT) एक आठवडाभर चालणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये फोटोग्राफी स्पर्धा, हेरिटेज वॉक, फूड फोटोग्राफी, ट्रॅव्हल फोटोग्राफी आणि कथाकथन यावर आधारित ऑनलाईन कार्यशाळा असतील, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.

महाराष्ट्र पर्यटन (World Photography Day 2021) संचालनालयाने 11 ऑगस्ट 2021 पासून इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर #MaharashtraThroughMyLens ही फोटोग्राफी स्पर्धा जाहीर केली आहे. यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या पर्यटनाशी निगडीत कुठलाही फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर किंवा फेसबूक वॉलवर #MaharashtraThroughMyLens या हॅशटॅगसह तसेच महाराष्ट्र टूरिझमच्या अधिकृत हँडलला टॅग करून या स्पर्धेत प्रवेश नोंदवू शकता.

स्पर्धकाच्या फोटोग्राफीची (World Photography Day 2021) अभिनव शैली, फ्रेमिंग, कॉम्पोझिशन, एडिटिंग स्किल्स आणि सोशल मीडियावरील त्यांच्या फोटोला मिळालेला प्रतिसाद हे निकष विचारात घेऊन विजेत्यांची निवड केली जाईल. 19 ऑगस्ट 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने निकाल घोषित केले जातील. प्रथम पुरस्कार 25 हजार रुपये, द्वितीय पुरस्कार 10 हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार 5 हजार रुपये याप्रमाणे बक्षीसे दिली जातील. त्याचबरोबर इतर निवड झालेल्या 20 स्पर्धकांना प्रत्येकी 1 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

याच उपक्रमातील दुसऱ्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील हेरीटेज वॉक असेल. यामध्ये वरिष्ठ छायाचित्रकारासोबत उत्साही 20 छायाचित्रकारांना हेरीटेज वॉकची संधी मिळेल. हा हेरिटेज वॉक 19 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत असेल. हेरीटेज वॉकच्या माध्यमातून विविध वारसा इमारतींना भेट देण्याची आणि वेगवेगळ्या दृष्टीकोनातून छायाचित्रे टिपण्याची संधी मिळेल. ही छायाचित्रे #MaharashtraThroughMyLens या हॅशटॅगसह महाराष्ट्र पर्यटनच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सला टॅग करुन सोशल मीडियावर अपलोड करण्यात येतील. जागतिक छायाचित्रण दिनी 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी महाराष्ट्र पर्यटनच्या इन्स्टाग्राम हँडलवर ऑनलाईन कार्यशाळा होईल. या इंस्टाग्राम ऑनलाइन कार्यशाळा प्रत्येकी 30 मिनिटांच्या असतील.

छायाचित्रण हे पूर्वीसारखे अवघड न राहता आता सोपे झाले असले तरी त्यातील बारकावे, कौशल्ये, प्रकाशयोजना, फोटोग्राफीची व्हिजन इत्यादी गोष्टी योग्य मार्गदर्शनाने साध्य करता येऊ शकतील. जागतिक फोटोग्राफी दिनाच्या औचित्याने होत असलेले फोटोग्राफीचे विविध उपक्रम हे नवोदित छायाचित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आहेत. यानिमित्ताने आयोजित होणारे विविध उपक्रम हे ज्ञान प्रदान करतीलच, शिवाय यानिमित्ताने महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे नव्याने जगासमोर येऊन पर्यटन विकासाला चालना मिळेल असा विश्वास पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर त्यांनी व्यक्त केला.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button