Thane

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम

मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येणार

special-brief-program-of-voter-list

ठाणे : भारत निवडणूक आयोगाने, 01 जानेवारी 2022 पर्यंत छायाचित्रासह मतदार यादीचा (Voter List Program) विशेष संक्षिप्त कार्यक्रम घोषित केला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत  9 ऑगस्ट,2021 (सोमवार) ते दि. 31 ऑक्टोबर, 2021 (रविवार) पर्यंत समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दुर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा घरोघरी भेट देऊन तपासणी / पडताळणी करणे, योग्य प्रकारे विभाग / भाग तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.

तसेच 01 नोव्हेंबर 2021 (सोमवार) रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणेत येणार आहे. 1 नोव्हेंबर 2021 (सोमवार) ते 30 नोव्हेंबर (मंगळवार) दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी आहे. 20 डिसेंबर, 2021 (सोमवार) पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच 05 जानेवारी, 2022 (बुधवार) मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे.

तरी सदर कार्यक्रमाची (Voter List Program) अंमलबजावणी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे करण्यात येणार असल्याने सदर कार्यक्रमासाठी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांकडून नेमण्यात आलेले मतदान केंद्रस्तरीय सहाय्यक (BLA) यांना उपस्थित राहणेबाबत सुचना देणेकामी या जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांना कळविण्यात आलेले आहे. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे यांनी कळविले आहे.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button