Thane

Bhiwandi water crisis: भिवंडीच्या पाणीसमस्येकडे महापालिकेचे दुर्लक्ष, आंदोलन करण्याचा स्थानिकांनी दिला इशारा

पाण्याची देयके वेळेवर वसूल करूनही या भागात गढूळ पाणीपुरवठाच होत आहे

ठाणे : मागील काही दिवसांपासून भिवंडीतील (Bhiwandi’s water crisis) कशेळी-काल्हेर विभागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून येत आहेत. गढूळ पाणीच्या पुरवठय़ामुळे विभागातील नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गढूळ पानेच पुरवठा होत असल्याने नागरिकांना दर आठवडय़ाला टँकरने पाणी विकत आणावे लागते मुख्य म्हणजे नागरिकांच्या या समस्येबाबत स्थानिक प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

municipal-corporation-ignores-bhiwandis-water-problem-locals-warn-to-agitate
मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरणतून (Bhiwandi water crisis) भिवंडी-निजामपूर महापालिकेला पाणीपुरवठा होतो. याच पाण्याचे महापालिकेच्या जलवाहिन्यांमधून शहरी आणि ग्रामीण भागात वितरण केले जाते परंतु गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे भिवंडीतील कशेळी-काल्हेर (Kasheli-Kalher water problem) भागामध्ये गढूळ पाणीपुरवठा होत आहे, अशा तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. या गढूळ पाण्याचा इतर कोणत्या कामासाठीही उपयोग होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले .

गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी रोज एका टँकरसाठी एक हजार रुपये खर्च करावे लागतात असे स्थानिकांकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे महापालिका नागरिकांकडून पाण्याची देयके वेळेवर वसूल करते पण या भागात गढूळ पाणीपुरवठाच होत आहे. याबाबत काल्हेर ग्रामपंचायतीत वारंवार तक्रारी करूनही काहीच उपाय करण्यात येत नाही. याबाबत मुंबई पाटबंधारे विभागाकडे तक्रार दाखल केली असून नागरिकांच्या समस्येकडे पुन्हा दुर्लक्ष झाल्यास आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा स्थानिक रहिवासी किशोर जाधव यांनी दिला.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button