Thane

कळव्यात दरड कोसळल्याने सहा घरे जमीनदोस्त

डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करावे अशी नागरिकांची अपेक्षा

landslide-in-kalwa-east-six-houses-were-demolished-due-to-landslide-in-kalwa

ठाणे : कळवा पूर्व भागातील इंदिरानगर परिसरात माँ काली चाळीवर काल (8 ऑगस्ट) रात्री दरड कोसळली. या दुर्घटनेत सहा घरांचे नुकसान झाले आहे. तर 25 घरातील कुटुंबांचे तातडीने स्थलांतर केले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Landslide in Kalwa East)

दुर्घटनेनंतर त्वरित आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी 20 ते 25 जणांना गोलाई नगर येथील ठाणे महापालिका शाळेत हलविले. (Landslide in Kalwa East) या अपघातात अडकलेल्या लोकांचे बचावकार्य सुरू आहे. इंदिरानगर हा भाग डोंगर उताराजवळ असल्याने या भागात पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता तर नाही ना? याचीही पडताळणी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात काही अंतरावर घोलाईनगर भागात दरड कोसळून 5 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.

भूमाफियांमुळे अनधिकृतरित्या अशी घरे डोंगर भागात उभारण्याचे काम सुरू आहे. त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जावई अशी मागणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. तर आता दुसरीकडे राज्य सरकारने डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button