Thane

मुरबाडच्या बारावी धरणातील माशांमध्ये धाग्याच्या आकाराचे जंतू, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

मत्स्य विभागातील अधिकारी तांडेल आणि सहाय्यक देवकते यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन केली पाहणी

germs-in-fishes-thread-shaped-germs-in-the-fish-of-the-baravi-dam-at-murbad

ठाणे : मुरबाड येथील बारवी धरण आणि मुरबाड नदीतील गोड्या (Germs In Fishes) पाण्यात मिळणाऱ्या माशांमध्ये 4-6 इंचाचे लाल-सफेद जंतू आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 2 वर्षांपासून या भागात गोड्या पाण्यातील माशांमध्ये एका वेगळ्याच जंतूचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. याच माशांच्या संसर्गामुळे अनेक माशांच्या शरिरात जवळजवळ 4 ते 6 इंच लांबीचे आणि रंगाने लाल ,सफेद धाग्याच्या आकाराचे जंतू सापडत आहेत.

माशांमध्ये सापडणाऱ्या जंतुंमुळे (Germs In Fishes) मासे विक्रेत्यांमध्ये आणि ग्राहकांमध्ये वाद होतात. त्यामुळे या जंतुंची योग्य विल्हेवाट आणि माशांना होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल सकट यांनी सरकारी यंत्रणांशी आणि फिशरीज संस्थांशी चर्चा केली.

माशांना होणाऱ्या या प्रादुर्भावाची शुक्रवारी (6 ऑगस्ट) मत्स्य विभागातील अधिकारी तांडेल आणि सहाय्यक देवकते यांनी प्रत्यक्षात बारवी धरणातील मासेमारी होत असलेल्या जागांची पाहणी केली. त्यांनी प्रत्यक्ष विविध जागेवर जाऊन माशांचे ताजे नमुने पुढील तपासणीसाठी आणि निरीक्षणासाठी जमा केले. शासनाकडून यावर लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button