Thane

रानभाज्या आणि कंदमुळे पाककला स्पर्धेचे आयोजन

स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात 10 वाजता स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार

cooking-competition-thane-organizing-cooking-competition-for-legumes-and-tubers

ठाणे : कृषी विभागामार्फत जिल्हास्तरीय रानभाज्या (Cooking competition thane ) महोत्सवाचा शुभारंभ दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

रानभाज्या महोत्सवाचे उदघाटन,प्रदर्शन व विक्री बाबत नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री . एकनाथजी शिंदे, यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या महोत्सवात रानावनात उगवणाऱ्या चविष्ट रानभाज्याचे औषधी गुणधर्म आणि पाककला यांची माहिती शहरी भागातल्या गृहिणींना देऊन घराघरात रानभाज्या पोहोचविता येतील.

तसेच सध्या शहरी भागातील जनतेने कोविडचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तिवर्धक रानभाज्या व कंदमुळे सेवन करणे हा स्वस्त आणि नैसर्गिक उपाय आहे त्यामुळे स्वातंत्र्यदिनी (Cooking competition thane) दिनांक 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात 10 वाजेला संपन्न होणाऱ्या जिल्हास्तरीय ‘रानभाज्या-कंदमुळे महोत्सव 2021 येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे यांच्या सहकार्याने सर्वांसाठी खुली ‘रानभाज्या आणि कंदमुळे पाककला स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे संयोजन इनरव्हील क्लब तर सर्व सहभागी स्पर्धकांना कोंकणी हौस-नव गोमंतक रेस्टॉरंट्स तर्फे बक्षिसांचे प्रायोजकत्व दिले गेले आहे. इच्छुकांनी नाव नोंदणी साठी इंनरव्हील क्लबच्या अक्षता मराठे (8454987666) / रेखा कर्णिक (9820672069) यांचेकडे करावी.
स्पर्धकांना कच्च्या भाज्या विनामूल्य 14 ऑगस्टला 12 ते 2 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळात ‘कोंकणी हौस’, रजनीगंधा सोसायटी, वंदना सिनेमा समोर, LBS मार्ग, ठाणे (प) येथे मिळतील.

रानभाज्या कंदमुळे स्पर्धेसाठी बांबूचे कोंब,अळूचे कंद,शेवगाची पाने, खरशिंग शेंग, कवळा यापैकी एक अथवा अधिक निवडून पातळ आणि सुका खाद्यपदार्थ बनविणे अपेक्षित आहे. तयार पदार्थ व त्यांच्या लिहीलेल्या पाककृती 15 ऑगस्टला रोजी सकाळी 10 वाजता परीक्षणाकरिता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचविण्यात याव्यात असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे. सहभागी स्पर्धकांमधून प्रथम 3 विजेत्यांना पालकमंत्री महोदयांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येईल. प्रथम 50 स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक आणि विशेष बक्षीस देण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ वृक्ष तज्ज्ञ डॉ नागेश टेकाळे, हॉटेल व्यावसायिक पराग जोगळेकर, ख्यातनाम स्त्रीरोगतज्ञा डॉ मधुरा कुलकर्णी या लाभल्या आहेत. यावर्षी प्रथमच रानभाज्या आणि (Cooking competition thane) कंदमुळांपासून बनविलेल्या विविध पाककृती खवय्यांच्या रसास्वादासाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तरी सदर जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सव करीता जास्तीत जास्त नागरिकांनी आणि पाककलेत सहभाग नोंदवावा असे आवाहन अंकुश माने,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे हे करीत आहे.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button