Thane

‘उडवाच मान माझी,माझा नकार नाही’ माहिती महासंचालकांनी गझलमधून केले अग्निशमन दलाच्या कामगिरीचे कौतुक

पूरपरिस्थितीमुळे बदलापूर पश्चिम भागात पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या शेकडो नागरिकांना बचावकार्यात मोलाचे योगदान

appreciation-of-fire-department

ठाणे : उडवाच मान माझी, माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही..अशा शब्दांत राज्याचे माहिती महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी पूरपरिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या (Appreciation of Fire Department) कर्मचाऱ्यांचे कौतूक केले.

बदलापूरात 22 जुलै 2021 रोजी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बदलापूर पश्चिम भागात पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात तसेच मदत व बचावकार्य करण्यात कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने मोलाचे योगदान दिले.

22 जुलै 2021 रोजी निर्माण झालेल्या पूर परिस्थितीतही पुरात अडकलेल्या नागरिकांची तसेच महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांची सुटका करण्यातही अग्निशमन दलाने (Appreciation of Fire Department) महत्वाची भूमिका बजावली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आशिष दामले यांनी याची दखल घेऊन वाढदिवसाचे औचित्य राज्याचे माहिती महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते फायर ऑफिसर भागवत सोनोने व त्यांच्या सहकाऱ्यांना बदलापूर भूषण पुरस्कार-2021देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान संयोजक दत्ता बाळसराफ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आशिष दामले, साहित्य गौरव ग्रंथालयाचे श्याम जोशी,सौ. कर्णिक मॅडम आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. पांढरपट्टे म्हणाले की,अग्निशमन दलाचे काम आव्हानात्मक असते, जीवाची पर्वा न करता अग्निशमन दल हे काम करीत असते. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्याची त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

उडवाच मान माझी, माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही..या गझलेच्या माध्यमातून त्यांनी अग्निशमन दलाचे कौतुक केले. यावेळी बदलापूर शहर पत्रकारांच्या वतीने मराठी पत्रकार परिषद ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय साळुंके यांनी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे स्वागत केले.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button