Technology

Xiaomi Cyberdog : शाओमीने लाँच केला रोबॉट डॉग, जाणून घ्या खास फीचर्स

सायबरडॉगच्या केवळ 1000 यूनिट्सचे उत्पादन केले जाणार

नवी दिल्ली : पाळीव प्राणी पाळण्याची आवड (Xiaomi Cyberdog) अनेकांना असते. परंतु, तुम्हाला प्राण्यांच्या जागी थेट रोबॉट डॉग पाळण्याची इच्छा आहे का? तर Xiaomi ने CyberDog नावाने एक रोबॉट सादर केला आहे. सुरुवातीला याच्या केवळ 1 हजार यूनिट्सचे उत्पादन केले जाणार असल्याची माहीती समोर आली आहे.

xiaomi-cyberdog-xiaomi-launches-robot-dog-see-special-features

शाओमी फॅन्स, इंजिनिअर्स आणि रोबॉटमध्ये रस (Xiaomi Cyberdog) असणाऱ्यांना हे उपलब्ध असेल. याची किंमत जवळपास 1.15 लाख रुपये इतकी असू शकते आहे. याच प्रकारचा एक गार्ड डॉग पेट बॉस्टन डायनामिक्सने देखील बनवला होता. त्याला Spot असे नाव देण्यात आले असून, त्याची किंमत 74,500 डॉलर्स आहे.

शाओमीच्या सायबरडॉगमध्ये अनेक प्रकारचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. परंतु अजून ही रोबोटिक्स डॉग लाँच करण्यामागचे कारण शाओमीने सांगितलेले नाही. या रोबॉटला पाळीव प्राण्यांप्रमाणे सांभाळता येऊ शकते. हयात मालकाच्या वॉइस कमांडला फॉलो करण्याची आणि कुत्र्याप्रमाणेच इकडे तिकडे फीरण्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे हा रोबॉट सुरक्षारक्षक डॉगप्रमाणेच काम करेल आणि तो कोणाला चावणारही नाही.

सायबरडॉगचे वजन 3 किलो असून तो 3.2 m/s च्या स्पीडने चालतो. त्याच्या मेंदूत Nvidia च्या Jetson Xavier AI चा सपोर्ट देण्यात आला आहे. हा रोबॉट कॅमेरा, सेंसर्स, जीपीएस मॉड्यूल Intel RealSense D450 डेप्थ सेंसिंग कॅमेरा आणि एक अल्ट्रा-वाइड अँगल fisheye लेंससोबत येतो.

या रोबोट डॉगला देखरेखीसाठी (Xiaomi Cyberdog) डोळे आहेत परंतु वायस घेण्यासाठी कोणतेही तंत्रज्ञान नाही. रोबॉट रियल टाइममध्ये आपल्या आजुबाजूच्या वातावरणाचे विश्लेषण करण्याची क्षमता आहे. तसेच तो नेव्हिगेशन मॅप तयार करून अडथळ्यांपासून वाचू शकतो.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button