Technology

व्हॉट्सअ‍ॅपचा नवा अपडेट, प्रोफाइल फोटोवर टॅप करुन दिसणार स्टेटस

व्हाट्सअ‍ॅपचे नवे फीचर बीटा व्हर्जन 2.21.17.5 मध्ये देण्यात आले असल्याची शक्यता

whatsapp-new-feature-whatsapps-latest-update-status-will-appear-by-tapping-on-the-profile-photo

नवी दिल्ली : देशातील लोकप्रिय (WhatsApp New Feature) इंस्टंट मेसेजींग अ‍ॅप ‘WhatsApp’ हे सतत आपले फीचर्स अपडेट करत असते. आता पुन्हा एकदा ही कंपनी असाच काही अनोखे अपडेट करणार आहे. व्हाट्सअ‍ॅप वापरकर्ते दररोज आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरुन त्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित गोष्टी मित्रांसोबत शेअर करतात.

तर आता व्हाट्सअ‍ॅपच्या नव्या अपडेट मध्ये स्टेटस अपडेट करणे आणखी मजेशीर होणार आहे. नव्या अपडेटमध्ये व्हाट्सअ‍ॅपच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये दिसणाऱ्या एखाद्याच्या प्रोफाइल पिक्चरवर हिरव्या रंगाची रिंग दिसेल ज्यावर टॅप करुन स्टेटस पाहता येईल. या आधी एखाद्याचे स्टेटस पाहण्यासाठी (WhatsApp New Feature) स्टेटसवर जाऊन मग स्टेटस पाहाता येत असे.

परंतु, कंपनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत सूचना जाहीर झालेली नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp New Feature) अपडेटबद्द्ल माहिती देणारी वेबसाईट WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, स्टेटस फीचर अपडेट नंतर जर वापरकर्त्याने त्याचे स्टेटस अपलोड केल्यास त्याच्या प्रोफाईल फोटोवर हिरव्या रंगाचे रिंग बनेल, ज्यामुळे त्याने नुकतेच स्टेटस अपडेट केले असल्याची माहिती मिळू शकेल.

हे फीचर बीटा व्हर्जन 2.21.17.5 मध्ये देण्यात आले आहे. नव्या फीचरची सध्या चाचणी सुरू असून कंपनी लवकरच याची घोषणा करू शकते. हे फीचर बऱ्यापैकी इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी मिळतेजुळते असेल.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button