Technology

टिक-टॉक बनला सर्वाधिक डाउनलोड केलेला अँप

फेसबुकला मागे टाकत मिळविली लोकप्रियता

tiktok-became-most-downloaded-app

नवी दिल्ली : टिक टॉक आता जगातील सर्वाधिक डाउनलोड होणारे (Tiktok Download) सोशल मीडिया अॅप बनले आहे. लॉकडाऊन दरम्यान टिक टॉक अॅपचा सर्वाधिक वापर केला गेला. तसेच, या अँपला युरोप आणि अमेरिकेत सर्वाधिक लोकप्रियता मिळाली आहे. याआधी या क्रमांकावर फेसबुक बनवले होते.

2020 मध्येही अव्वल

गेल्या वर्षीदेखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या यादीत टिक टॉक (Tiktok Download) सर्वात वरच्या क्रमांकावर होता. टिक टॉकची सुरुवात बाइटडान्स या मूळ कंपनीने 2017 मध्ये केली होती. तेव्हापासून ते अमेरिकेत फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरला स्पर्धा देत आहे. हे अँप गेमर्समध्ये सर्वात लोकप्रिय झाले असून जेव्हा ते गेम खेळतात तेव्हा ते आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांशी गप्पा मारतात. लॉकडाऊन दरम्यान लोकांनी या अँपचा प्रचंड वापर केला.

व्हॉट्सअॅपच्या नवीन धोरणाचा फायदा

यावर्षी, व्हॉट्सअॅपने घोषित केले की व्हॉट्सअॅप वापरकर्ते जे सामग्री अपलोड करतात, सबमिट करतात, साठवतात, पाठवतात किंवा प्राप्त करतात ती कंपनी कुठेही वापरू शकते. कंपनी हा सर्व डेटा इतर कोणासोबतही शेअर करू शकते. तसेच, जर वापरकर्त्याने हे धोरण स्वीकारले नाही, तर तो त्याचे खाते वापरू शकणार नाही. टिकटॉकसह इतर प्लॅटफॉर्मला या धोरणाचा लाभ मिळाला.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button