Technology

Oppo Reno 6 Pro 5G : oppo चा 5G स्मार्टफोन ग्राहकांच्या भेटीला, पहा के आहेत वैशिष्ट्य

HDFC कार्डमधून फोन खरेदी करणाऱ्यांना 3,000 रुपयांची सूट देण्यात येणार

oppo-reno-6-pro-5g-oppos-5g-smartphone-finally-launches-in-india-see-what-are-the-features

नवी दिल्ली : सध्या बाजारात 5G स्मार्टफोनचा ट्रेंड खूप वाढला त्यात जर तुम्ही पण नवीन 5G फोन घेण्याच्या विचारात असाल तर OPPO कंपनीने नुकतेच बाजारात त्यांचा नवीन 5G स्मार्ट फोन लॉंच केला आहे. ह्या ओप्पोचा ओप्पो रेनो 6 प्रो 5 जी (Oppo Reno 6 Pro 5G) हा स्मार्टफोनवर बऱ्याच ऑफर्सदेखील आहेत.

ओप्पोचा ओप्पो रेनो 6 प्रो 5 जी यांची सध्याची किंमत 39,990 रुपये आहे. तर ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्टकडून मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन केवळ 33,990 रुपयांच्या किंमतीत विकत घेऊ शकतात. दरम्यान HDFC कार्डमधून खरेदी करणाऱ्यांना 3,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे.

ओप्पो रेनो 6 प्रो 5G हा (Oppo Reno 6 Pro 5G) फोन 6.55 इंचाचा फुल एचडी + कर्व्ड AMOLED डिस्प्ले ने परिपूर्ण आहे. तर यात डिस्प्ले 1080× 2400 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट आहे. त्याचबरोबर 12 जिबी GB रॅमसह फोनमध्ये 256 GB इंटरनल स्टोरेज आहे. विशेष म्हणजे या स्मार्ट फोन हा मॅट फिनिश देण्यात आली आहे. ज्याने या फोनचा मागील भाग चमकदार दिसतो.

ओप्पो रेनो 6 प्रो 5G स्मार्टफोनच्या मागील बाजूस चार कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यातील मागच्या बाजूला 64-मेगापिक्सलचा (Oppo Reno 6 Pro 5G) प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मोनो कॅमेरा सेन्सर आहे. आणि पुढच्या बाजूला सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये जी 65 W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500 mAh ची बॅटरी आहे.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button