Sports

क्रिस्टियानो रोनाल्डोची घरवापसी

रोनाल्डो पुन्हा मँचेस्टर युनायटेडसाठी खेळणार

cristiano-ronaldo-returns-to-manchester-united

मँचेस्टर : जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्टार्सपैकी एक, पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो पुन्हा एकदा त्याच्या जुन्या क्लब मँचेस्टर युनायटेडसाठी (Ronaldo Manchester United) खेळणार आहे. युनायटेडने रोनाल्डोला इटालियन क्लब युव्हेंटसकडून पुन्हा एकदा विकत घेतले आहे. याआधी रोनाल्डो युनायटेडकडून 2003 ते 2009 सालापर्यंत खेळला होता.

36 वर्षीय रोनाल्डोने आतापर्यंत 5 वेळा बॅलोन डी ओर पुरस्कार जिंकला आहे. हा फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. रोनाल्डो त्याच्या कारकिर्दीत 30 पेक्षा जास्त मोठ्या फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱ्या संघाचा एक भाग आहे. यात 5 यूईएफए चॅम्पियन्स लीग, 4 फिफा क्लब वर्ल्ड कप, इंग्लंड, स्पेन आणि इटलीमधील सात लीग जेतेपद आणि 1 युरो कप जेतेपदाचा समावेश आहे.

रोनाल्डो (Ronaldo Manchester United) त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 4 क्लबसाठी खेळला आहे. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात स्पोर्टिंग सीपीने केली. रोनाल्डोने या क्लबसाठी 31 सामन्यांत 5 गोल केले. त्यानंतर तो 2003 मध्ये इंग्लिश क्लब मँचेस्टर युनायटेडमध्ये सामील झाला. रोनाल्डोने या क्लबसाठी 292 सामन्यांमध्ये 118 गोल केले. रोनाल्डो 2009 मध्ये रियल माद्रिदमध्ये सामील झाला. त्याने स्पॅनिश क्लबसाठी 438 सामने खेळले आणि 450 गोल केले.

2018 मध्ये रोनाल्डो स्पेन सोडून इटलीला पोहोचला. त्याने युव्हेंटसकडून खेळताना 133 सामन्यांमध्ये 101 गोल केले आहेत. या दरम्यान, रोनाल्डोने संघाला 2 सीरी-ए जेतेपद आणि इटालियन चषक जिंकण्यास मदत केली. रोनाल्डो सध्या युव्हेंटसचा प्रमुख भाग होता. मात्र रोनाल्डो चॅम्पियन्स लीग जिंकण्यास युव्हेंटसला मदत करू शकला नाही आणि हेच त्याचे या संघाबाहेर पाडसासह मुख कारण असल्याचे मानले जात आहे. युनाइटेड आणि युव्हेंटस या दोन क्लबमधील रोनाल्डोसाठी करार 25 दशलक्ष युरो (सुमारे 216 कोटी रुपये) मध्ये झाला आहे.

जुवेंटसचे मॅनेजर मॅक्स अलेग्री म्हणाले होते की रोनाल्डोला युव्हेंटसमध्ये राहायचे नाही. शनिवारी खेळण्यात आलेल्या एम्पोलीविरुद्धच्या सामन्यात त्याला प्लेइंग -11 मध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये असे त्याने स्वतःहून सांगितले होते. यानंतर दुसऱ्या संघाकडून खेळण्यासाठी त्याने युनाइटेडचे कट्टर शत्रू मँचेस्टर सिटीशीही बोलल्याची चर्चा होत होती.

तथापि, पेप गार्डिओलाच्या संघाने या सर्व गोष्टींना नकार दिला आणि मँचेस्टर युनायटेडचे ​​व्यवस्थापक ओले गुन्नार सोल्स्कजायर यांनी रोनाल्डोसोबत करार निश्चित झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, “रोनाल्डो हा या क्लबच्या महान खेळाडूंपैकी एक आहे. मीही त्याच्याबरोबर खेळलो आहे आणि त्याने संघात परत येण्याची तयारी दाखविल्याबद्दल मी आभारी आहे.”

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button