Raigad

कळंबोली येथील गोदामांमध्ये उभारणार कोविड सेंटर

महासभेत विविध विषय मंजूर

panvel-municipal-corporation-announces-kalamboli-covid-center

पनवेल : पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज (20 ऑगस्ट) महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे ऑनलाईन पध्दतीने (Kalamboli Covid Center) घेण्यात आली. यावेळी उपमहापौर जगदीश गायकवाड, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसचिव धैर्यशील जाधव पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेच्यावतीने कळंबोली येथे भारतीय कापूस निगमच्या गोदामांमध्ये सुसज्ज असे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. या सेंटरकरीता रायगड सुरक्षा रक्षक मंडळ यांचे सुरक्षा रक्षक घेणे तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्याकडून सुरक्षा रक्षक घेणे असे सुरक्षा रक्षक घेण्यास महासभेने मंजूरी दिली आहे.

पनेवल शहरातील चार धोकादायक शौचालये निष्कासित करण्यास महासभेने मंजूरी दिली. यामध्ये एमएसईडीसीएल कार्यालय लगतचे शौचालय, हुतात्मा स्मारकासमोरील शौचालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग येथील रेाज बाजारमधील शौचालय तसेच लाईन आळी येथील सुतार पेंटर घराजवळील शौचालय यांचा यामध्ये समावेश आहे.

प्रश्नोतरांच्या तासाला विविध विषयांवरती चर्चा (Kalamboli Covid Center) करण्यात आली. यावेळी मुख्य लेखापरिक्षक विठ्ठल सुडे आणि सहाय्यक आयुक्त तथा लेखाधिकारी चंद्रशेखर खामकर यांची प्रशासकीय कारणास्तव बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ करण्यात आला.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button