Raigad

सिडकोकडून सेवा हस्तांतरीत करण्याविषयी आयुक्तांनी घेतली बैठक

येत्या काळात अग्निशमन, उद्याने, ड्रेनेज, विद्युत, रस्ते-गटारी या सेवा देखील पालिका आपल्याकडे घेणार

ganesh-deshmukh-in-talks-with-cidco-to-pmc-transfer

पनवेल : सिडकोकडून विविध सेवा पनवेल महापालिकेला हस्तांतरीत (Cidco to PMC Transfer) करण्याच्या पार्श्वभूमीवर आज (23 ऑगस्ट) आयुक्त गणेश देशमुख यांनी उपायुक्त व संबधित विभाग अधिकारी यांची बैठक आयुक्तांनी घेतली.

यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव,सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, शहर अभियंता संजय जगताप,मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, अग्निशमन विभाग प्रमुख अनिल जाधव, अधिकारी उपस्थित होते.

सध्या सिडको विभागातील घनकचऱ्याची सेवा महापालिका (Cidco to PMC Transfer)  पुरवित असून येत्या काळात अग्निशमन, उद्याने, ड्रेनेज, विद्युत, रस्ते-गटारी या सेवा देखील पालिका आपल्याकडे घेणार आहेत. याबाबत या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.

सिडकोकडून सेवा हस्तांतरीत केल्यावरती त्यांच्या देखभालीचा अंदाजित खर्च, त्याची देखभाल करण्याकरिता लागणारे मनुष्यबळ, प्रत्येक नोडमध्ये सिडकोने पुर्ण केलेली कामे तसेच अपूर्ण कामे यांचा सविस्तर आढावा घेऊन या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button