Pune
Trending

Pune Police : पुणे पोलीस दलातील हफ्तेखोरी चव्हाट्यावर

जनतेकडून होत आहे चौकशीची मागणी

पुणे : पुणे पोलीस दलामध्ये (Pune Police) सध्या पदासाठी मोठ्या प्रमाणात खेळी खेळली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हफ्तेखोरी सुरु असून आता ती चव्हाट्यावर येत आहे. मुळात म्हणजे यामध्ये पोलीस अधिकारीच खेळी खेळत असल्याचे बोलले जात आहे. पोलिस अधिकारी म्हणून आपली बदली झाल्यानंतर पुहा त्याच पदावर येण्यासाठी पोलीस मुख्यालयात षडयंत्र रचले जात आहे. यामध्ये पोलीस मुख्यालयात काम करणाऱ्या महिला उपायुक्त यांनी काही अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत मिळून षडयंत्र केले असल्याची माहिती मिळत आहे.

pune-police-taking-bribe-news-breaking

पुण्यात मोठ्या प्रमाणत हफ्तेखोरी चालायची, अशा अनेक बातम्या समोर आल्या. त्या हफ्तेखोर लोकांच्या बदल्या तत्कालीन पुणे झोन वन DCP प्रियांका नारनवरे (DCP Priyanka Narnaware Pune Police) यांनी करत पुणे शहराला एक वेगळे वळण दिले होते. मात्र त्यांच्या या कामामुळे त्यांच्याविरूध्द कट रचला जात आहे.

व्हायरल होत असलेल्या ऑडियोमध्ये काहीतरी गफलत असल्याचा संशय जनतेतून व्यक्त केला जात आहे. पोलीस विभागातील ही हफ्तेखोरी व त्यातून होणारे वाद कधी थांबतील? हा मोठा प्रश्न आता जनतेतून उपस्थित केला जात आहे. या सगळ्या प्रकरणात, पुण्यातील हप्तेखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांना संरक्षण देऊन कठोर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना बदनाम करून पदावरून काढण्याचा डाव असल्याचा संशय जनतेकडून व्यक्त केला जात आहे.

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button