Pune

दुकाने, मॉल, उपाहारगृहांना आजपासून रात्री दहापर्यंत व्यवसायाची मुभा

पिंपरीतील व्यावसायिकांना व्यवसायाचे स्वातंत्र्य मिळणार

pune-new-guideline-shops-malls-restaurants-allowed-business-from-today-till-10-pm

पुणे : करोनाच्या दीर्घकाळ र्निबधांनंतर रविवारपासून 15 ऑगस्ट पुणे आणि पिंपरीतील व्यावसायिकांना व्यवसायाचे स्वातंत्र्य मिळणार (Pune New Guideline) आहे. नव्या नियमांनुसार करोना प्रतिबंधक उपाययोजना करून दुकाने, मॉल आणि उपाहारगृहे आठवडय़ाचे सर्व दिवस रात्री दहापर्यंत खुली राहणार असून चित्रपटगृहे, नाटय़गृहे आणि मंदिरे पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहतील.

राज्य शासनाच्या निर्देशांनुसार पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सुधारित आदेश जारी केले. दुकाने, उपाहारगृहे, मॉल आणि मंगल कार्यालयांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होऊन 14 दिवस पूर्ण होणे बंधनकारक असेल. उपाहारगृहे आणि बार रात्री दहा वाजेपर्यंत आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. पार्सलसेवा 24 तास सुरू राहील. प्रतीक्षा काळात मास्क (मुखपट्टी) बंधनकारक राहील.

मॉलमध्ये प्रवेश करताना ग्राहकांना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. इनडोअर खेळांसाठी खेळाडू, कर्मचारी व व्यवस्थापकांचे लसीकरण पूर्ण होऊ न 14 दिवस झालेले असणे बंधनकारक आहे. बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅ श, पॅरललबार, मलखांब या खेळांसाठी केवळ दोनच खेळाडूंना परवानगी असेल.

सर्व जिम, योग केंद्र, सलून-स्पा 50 टक्के क्षमतेने रात्री दहापर्यंत सुरू ठेवता येतील. सर्व मैदाने, उद्याने नियमित वेळेत सुरू राहतील. विवाह सोहळ्यासाठी खुले कार्यालय, लॉनमध्ये क्षमतेच्या निम्मी तर जास्तीत जास्त दोनशे, बंदिस्त कार्यालय अथवा उपाहारगृहांसाठी (Pune New Guideline) क्षमतेच्या निम्मी तर जास्तीत जास्त शंभर इतकीच उपस्थित बंधनकारक राहील.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button