Pune

त्या व्हायरल ऑडियो क्लिपवर संबधित अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण, पहा नेमक्या त्या काय म्हणाल्या?

माझ्या डिपार्टमेंटचे नाव खराब होऊ नये म्हणून मी चांगले काम केल्याने मला हे आरोप सहन करावे लागत आहेत - प्रियांका नारनवरे

dcp-priyanka-narnaware-update-on-fake-audio-clip

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक ऑडियो क्लिप व्हायरल होत आहे. पुणे जिल्ह्यात झोन वन येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डी. सी. पी. प्रियांका नारनवरे (DCP Priyanka Narnaware) यांची ही व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिस अधिकाऱ्याची अशी व्हिडिओ क्लीप व्हायरल झाल्याने याची दखल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली आहे. या पुणे DCP यांच्या ऑडिओ क्लिपबाबत तात्काळ चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहे. तसेच लवकरात लवकर अहवाल सादर करावा असेदेखील त्यांनी म्हंटले आहे. आता यावर संबधित डी. सी. पी. प्रियांका नारनवरे (DCP Priyanka Narnaware) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

प्रसिद्ध वृत्तवाहिनीला माहिती देताना व्हायरल व्हिडिओ क्लिप बद्दल त्यांनी आपली बाजू मांडली आहे. पाहुयात नेमक्या त्या काय म्हणाल्या?

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अद्याप चौकशी झालेली नाही. या चौकशीत जे सत्य आहे, ते बाहेर येईल. अपप्रकार आणि डिपार्टमेंटच नाव खराब होऊ नये म्हणून मी चांगले काम केले. त्यांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्या गोष्टीमुळे मी हे आरोप सहन करत आहे. सायबर क्राईमकडे मी याची तक्रार करणार आहे. माझ्या ऑफिस मध्ये 12-12 वर्ष काम करणारे लोक होते. त्यांच्या कामामुळे वातावरण दूषित होत होते, त्यामुळे त्यांना कामावरून परत पाठविण्यात आले. त्यांनी हे सहन झाले नाही आणि त्याच्या पाठिंब्यातील लोकांनी मिळून हे केले आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रामाणिक काम करणाऱ्यांवर अशा प्रकारचे अनुभव येत आहेत. मात्र आम्ही ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करीत आहोत.

– प्रियांका नारनवरे, पुणे पोलिस आयुक्त

गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मी देखील ती ऑडियो क्लिप ऐकली आहे. निश्चितच ही गंभीर बाब आहे. याबाबत पोलिसांना सांगितले आहे की, त्यांनी याबाबत चौकशी करून अहवाल द्यावा. चौकशी अहवालानंतर राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल.

– दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button