Pune

“अर्ध्या झाकलेल्या आणि अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो” राज ठाकरेंच्या भाषणाची मार्मिक सुरुवात

जन्मशताब्दी सोहळ्यात राज ठाकरे यांनी आशाताईंचे देखील कौतुक केले

babasaheb-purandare-birth-centenary-at-pune

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare Birth Centenary) यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला चिरतरुण आवाजाच्या गायिका आशा भोसले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप नेते आशिष शेलार, पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यासारख्या मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी राज ठाकरे यांनी अनोख्या शैलीत भाषणाला सुरुवात केली आणि सगळीकडे एकच हशा पिकली.

जन्मशताब्दी सोहळ्यात आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे भाषणाची सुरुवात करताना म्हणतात, “अर्ध्या झाकलेल्या आणि अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो.” त्यांच्या या दिमागदार शैलीमुळे सगळीकडे मजेदार वातावरण तयार झाले. यावेळी व्यासपीठावरुन उपस्थितांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी मास्क लावला नव्हता. खरे तर गेल्याच महिन्यात राजकीय दौऱ्यावर असताना राज ठाकरे पुण्यात बाबासाहेब पुरंदरेंच्याही भेटीला गेले होते. पुण्याच्या संपूर्ण दौऱ्यात विनामास्क दिसलेले राज ठाकरे बाबासाहेबांच्या भेटीवेळी मात्र मास्क घालून संवाद साधताना पहायला मिळाले.

त्यामुळे राज ठाकरेंनी पहिल्यांदाच घातलेल्या मास्कच्या चर्चाही राज्यात चांगल्याच रंगल्या होत्या. परंतु आजच्या जन्मशताब्दी सोहळ्यात व्यासपीठावर बहुतांश मान्यवरांनी मास्क घातला नसल्याचे पाहायला मिळाले. मात्र मास्कधारी प्रेक्षकांना संबोधताना राज ठाकरेंनी “अर्ध्या झाकलेल्या अन् अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो” अशी भाषणाची मार्मिक सुरुवात केली.

भाषणात राज ठाकरे काय म्हणाले ?

“मी पहिल्यांदा बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare Birth Centenary) या व्यक्तीला सहा वर्षांचा असताना पाहिले. त्याच्यानंतर कित्येक वर्षे मी त्यांना फक्त पाहत आणि वाचत होतो. आता मला त्यांचा सहवास लाभला. बाबासाहेब इतिहास जरी सांगत असले तरी ते वर्तमानात भानावर यायला शिकवतात, इतिहासात ज्या चुका केल्या, त्या वर्तमानात करू नये हे बाबासाहेब सांगतात. इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा इतिहास बाबासाहेब सांगतात” अशा शब्दात भाषणात राज ठाकरेंनी बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाचे कंगोरे उलगडले.

यावेळी राज ठाकरे म्हणतात, कोण म्हणेल आशाताई 88 वर्षांच्या आहेत. या वयातही काय दिसतात ना, अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरु होती. मी म्हटले आपण जाहीरपणे सांगावे. बाबासाहेब पुरंदरे, आशाताई इथे मंचावर बसले आहेत, आपण फक्त यांच्या वयाचे आकडे मोजायचे, याच्यापलीकडे आपल्या हातात काही नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button