Pune

पुण्यात देशातील पहिल्या पुरातत्त्व म्युझियमची होणार उभारणी

महाराष्ट्रातील पुरातत्त्व विभागाच्या म्युझियमला 300 कोटींचा निधी

archeological-museum-pune-the-countrys-first-archeological-museum-will-be-set-up-in-pune

पुणे : पुणेकरांची मान अभिमानाने (Archeological Museum Pune) उंचावणारी बातमी समोर आली आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यात देशातील सर्वांत मोठा बुद्ध लेणी समूह असून, त्याच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपये खर्च करून देशातील पहिले पुरातत्त्व म्युझियम पुण्यात उभारले जाणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसराला अडीच हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन (Archeological Museum Pune) इतिहास लाभला आहे. येथील सातवाहन काळातील ग्रीक आणि रोमन संस्कृतीची ओळख डेक्कन कॉलेजच्या इतिहास आणि संशोधन विभागाने केलेल्या उत्खननातून जगासमोर आली आहे. इथे नाणेघाट ते पैठण सातवाहनकालीन व्यापारी मार्ग होता.

केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची पुन्हा भेट घेऊन म्युझियम च्या प्रस्तावावर निर्णय घेण्याची विनंती केली. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटनमंत्र्यांनी प्रस्ताव मंजूर करीत महाराष्ट्रातील पुरातत्त्व विभागाच्या म्युझियमला 300 कोटींचा निधीही मिळाला असून लवकरच केंद्रीय पर्यटन (First Archeological Museum India) विभाग, डेक्कन विद्यापीठ कुलगुरू प्रमोद पांडे आणि सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्यामध्ये करार होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

म्युझियमसाठी जुन्नर नगर परिषदेकडून त्यांच्या मालकीच्या तीन इमारती दिल्या आहेत. त्या इमारतीत प्राचीन स्मारके, वारसा, उत्खननातून सापडलेले अवशेष विद्यार्थांच्या अभ्यासासाठी तयार होत आहे. पुरातत्व म्युझियमचा हा (First Archeological Museum India ) प्रकल्प विद्यमान पुरातत्त्व विभागाचे प्रमुख पांडुरंग साबळे यांच्या देखरेखीत होणार असून गणपती विसर्जनानंतर केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी पुणे भेटीदरम्यान म्युझियम उभारणीची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button