Politics

महाराष्ट्रातील महापालिका निवडणूक पुढे ढकलणार

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत

state-government-postponed-municipal-election-date

मुंबई : ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा निर्णय होईपर्यंत महाराष्ट्रात महापालिका (Municipal Election Date) आणि इतर सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली.

महाराष्ट्रात पुणे, मुंबई, कोल्हापूरसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहेत. मात्र, ओबीसी आरक्षणावरून या निवडणुकांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यात भरीस भर म्हणून कोरोनामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सध्या निवडणूक आयोगाने कोरोनाचे नियम पाळून निवडणुका घेण्याचे नियोजन केले असले तरी, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली लागत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये असा दबाव टाकला जात आहे.

‘आगामी निवडणुकांबाबत (Municipal Election Date) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील प्रमुख मंत्री तसेच विरोधी पक्षनेते उपस्थित होते. त्यामध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत मुख्य सचिवांकडून सादरीकरण करण्यात आले. ओबीसींवर झालेला अन्याय दूर होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, असे बैठकीत ठरविण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सुप्रीम कोर्टाने ओबीसींबाबत निकाल दिला असल्याने आणि राज्यात पालघर, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाची संख्या जास्त असल्याने ‘ओबीसी’ला प्रतिनिधित्त्व मिळणार नाही, आणि यामुळे आरक्षणाचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, हे पाहून ओबीसींना आरक्षण देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीतील तीन पक्ष आणि भाजपची जोरदार तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली असून त्यांची आता थेट शिवसेनेला आव्हान देण्याची भाषा सुरू आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मुबंई महापालिकेच्या प्रचाराचा भाजपने जणू श्रीगणेशा केला आहे.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button