Politics

का झाली नारायण राणेंना अटक आणि सुटका? वाचा सविस्तर

नारायण राणेंच्या एका वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यभर 'राडा'

narayan-rane-latest-news-as-maharashtra-politics-clinching-towards-different-way

महाड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane Latest News) यांना रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्‍वर येथे अटक करुन महाड न्यालयात हजर केले गेले. प्रथम वर्ग ऩ्यायदंडाधिकारी शेखभाऊसो पाटील यांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकून राणे यांना जामिन मंजूर केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात संध्याकाळी उशीरा आणल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शेखभाऊसो पाटील यांच्यासमोर हजर केले जाणार असल्याचे सूत्रांकडून कळाले. मात्र नारायण राणेंना न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्याचे आदेश देण्यात आल्याने रात्री 10 वाजता न्यायालयासमोर आणण्यात आले व सुनावणीस प्रारंभ झाला.

न्यायालयात नारायण राणे (Narayan Rane Latest News) यांची बाजू मुंबईतील वकील अ‍ॅड. राजेंद्र शिरोडकर यांनी मांडली आणि त्यांना अ‍ॅड.अंकित बंगेरा, अ‍ॅड. महेश मोहिते, अ‍ॅड.आदित्य भाटे, अ‍ॅड. निलेश रातवडकर यांनी सहाय्य केले. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. भूषण साळवी यांनी यूक्तीवाद करत राणे यांची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरूद्ध केलेल्या आक्षेपार्ह विधानामागे त्यांचा काही कट आहे का? याचा तपास करणे आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले. त्यास राणे यांच्या वकिलांनी विरोध केला.

राणे यांनी असे विधान करण्यामागे त्यांचा कोणताही हेतू नव्हता तर जाहीर पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले आणि राणेंच्या वादग्रस्त विधानावर फार भर न देता राणे यांचे वय, पद आणि तब्येत ही तीन कारणेही त्यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडली. शेवटी न्यायालयाने राणे यांना न्यायालयीन कोठडी देत जामिनाचा मार्ग मोकळा झाला. रात्री साडेअकराच्या सुमारास राणे जामिनावर सुटले.

नारायण राणेंविरुद्ध (Narayan Rane Latest News) महाडसह नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेसाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून पोलिसांची पथके रत्नागिरीमध्ये पाठविण्यात आली होती. अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात नारायण राणेंनी धाव घेतली. मात्र सूनावणी तातडीने घेण्यास हायकोर्टानेही नकार दिल्याने राणे यांना अटक होणार हे स्पष्ट झाले आणि याचदरम्यान रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी राणे यांची भेट घेऊन वस्तूस्थितीची कल्पना दिली. नारायण राणे यांना संगमेश्‍वर येथे ताब्यात घेऊन अटक करण्यात आली व रात्री महाड न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button