Politics

‘आमचं पण सरकार वर आहे’ अटकेच्या प्रक्रियेवर केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे उत्तर

गुन्हा दाखल नसताना, उगाच अटक होणार वगैरे काय नॉरमल माणूस वाटलो काय तुम्हाला? – नारायण राणे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane Controversy) यांनी खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली. यानंतर आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रारदेखील केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे (Union Minister Narayan Rane Controversy) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्यानंतर आता नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणच्या दिशेने रवाना झाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अशी जहरी टीका करण्याची ही पहिलीच वेळ नसल्याने त्यांच्या या वक्तव्यावर काय कारवाई होणार ही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एकूण प्रकरणावर नारायण राणे काय म्हणतात?

शिवसैनिकांनी भाजपची कार्यालय फोडली यावर पत्रकारांनी नारायण राणे यांना प्रश्न विचारता ते म्हणतात, माहिती अभावी मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे, याची माहिती मला नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नसून, तुम्ही तपासून पाहा, मग आपआपल्या टीव्हीवर दाखवा, नाहीतर तुमच्याविरोधात माझी केस आधी दाखल होईल. गुन्हा दाखल नसताना, उगाच अटक होणार वगैरे काय नॉरमल माणूस वाटलो काय तुम्हाला? कोणाचे म्हणणे आहे, कोण शिवसैनिक म्हणता, नाव सांगा, कोण शिवसेना? बडगुजर कोण मी ओळखत नाही.

मी बातमीवर विश्वास ठेवणार नाही. मला माहिती मिळाल्यावर आम्ही समर्थ आहोत. दगड मारुन जाणे हा पुरुषार्थ नाही. आम्ही पाहू, काय पुरुषार्थ आहे. ज्यावेळेला शिवसेनाभवन फोडू असे म्हणाल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले थोबाड फोडू, हा क्राईम नाही का? त्यावेळी का गुन्हा नाही?

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button