Politics

किरीट सोमय्यांना शिवसेनेविरुद्धचे ट्विट पडले महागात, थेट गाडीवर हल्ला

वाशिम दौऱ्यात असताना किरीट सोमय्यांवर हल्ला

kirit-somaiya-latest-news-kirit-somaiyas-tweet-against-shiv-sena-was-expensive

वाशिम : वाशिम दौऱ्याची भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya latest News) यांनी आज सुरूवात राड्याने झाली आहे. रिसोड तालुक्यातील देगाव येथे शिवसैनिकांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना काळे झेंडे दाखवल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर यावेळी शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर निळी शाई फेकण्याचा देखील प्रयत्न केला आहे. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी शिवसैनिकांवर पोलिसांचा लाठीमार केला असल्याचे समजते.

वाशिम दौऱ्यात किरीट सोमय्या (Kirit Somaiya latest News) देगाव येथील भावना गवळी यांच्या रिसोड येथील बालाजी पार्टिकल बोर्ड या कारखान्याला भेट देणार आहेत. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. स्वत: किरीट सोमय्या यांनीही या घटनेचे फोटो ट्विट केले आहेत.

भावना गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक होत किरीट सोमय्या हे वाशिम दौऱ्यावर दाखल झाले असताना त्यांच्या विरोधात आंदोलन केले.

किरीट सोमय्या हे वाशिम दौऱ्यावर येणार असल्याने शिवसैनिक आधीपासून आक्रमक झाले होते. शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा पाहून सोमय्यांच्या दौऱ्यात चोख पोलीस बंदोबस्तदेखील करण्यात आला होता. मात्र, तरीही आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या ताफ्यावर दगड भिरकावला आणि शाईफेक केली.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button