Politics

जनआशीर्वाद यात्रेसाठी नारायण राणे कोकणात दाखल

कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात जय्यत तयारी, मोठा पोलिस बंदोबस्त

jan-ashirwad-yatra-to-be-held-in-konkan-with-narayan-rane

रत्नागिरी : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra Narayan Rane) आजपासून पुन्हा एकदा रत्नागिरीतून सुरु झाली असून राणेंच्या आगमनावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून रत्नागिरी दौरा 4 वाजता आटोपून राणे सिंधुदुर्गात जाणार आहे.

नारायण राणे यांचे सिंधुदुर्गात शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता खारेपाटण येथे आगमन होणार आहे. त्यानंतर ही यात्रा तळेरे, वैभववाडी, फोंडाघाट मार्गे रात्री कणकवलीत दाखल होणार असून या यात्रेची कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. राणेंच्या या जनआशीर्वाद यात्रेसाठी ठिकठिकाणी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वागताचे भव्य बॅनर लावले आहेत. या यात्रेचा समारोप सावंतवाडी येथे रविवारी सायंकाळी होणार आहे.

नारायण राणे शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मुंबईहून रत्नागिरी विमानतळावर दाखल झाले असून आता रत्नागिरीतून लांजा, राजापूर अशी त्यांची यात्रा आहे. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर नारायण राणे हे प्रथमच सिंधुदुर्गात येत असल्याने त्यांच्या यात्रेची (Jan Ashirwad Yatra Narayan Rane) जिल्हावासीयांना उत्सुकता आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त जिल्ह्यात ठेवण्यात आला आहे. खारेपाटणमार्गे तळेरे, वैभववाडी, फोंडाघाट असा दौरा करत राणे रात्री कणकवलीत दाखल होतील.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button