Parliament Monsoon Session 2021
Trending

Rajya Sabha Adjourned : राज्यसभा दुपारी 2 पर्यंत स्थगित, पेगासस वाद मिटता मिटत नाही

विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आतापर्यंत पावसाळी अधिवेशन विस्कळीत

नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Rajya Sabha adjourned) तिसऱ्या आठवड्याचा आज तिसरा दिवस आहे. पेगासस प्रकरणावरून आजही संसदेत गदारोळ निर्माण झाला आहे. राज्यसभेत पेगाससच्या मुद्द्यावर विरोधी खासदारांनी घोषणाबाजी केली. यानंतर राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 पर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

the-rajya-sabha-adjourned-until-2-p-m-the-pegasus-controversy-is-not-over

विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आतापर्यंत पावसाळी अधिवेशन विस्कळीत झाले आहे. विरोधी पक्ष पेगासस हेरगिरी घोटाळा, कृषी कायदे यावर सतत हल्ला करत आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणावर मंगळवारी संसदेत गोंधळ सुरूच होता. सरकार आणि विरोधक दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष 11 दिवस संसदेत सुरू आहे.

‘पेगासस प्रोजेक्ट’ मीडिया अहवालावर विरोधी खासदारांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे राज्यसभा दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात (Rajya Sabha adjourned) आली आहे.

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते, राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे की, आम्हाला आधी पेगाससवर चर्चा करायची आहे आणि आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न, महागाई, पेट्रोल-डिझेलचे दर आणि इतर मुद्द्यांवरही चर्चा करण्यास तयार आहोत. सर्व विरोधी पक्षांनी त्यास सहमती दर्शवली आहे पण दुर्दैवाने सरकार चर्चा करण्यास तयार नाही.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button