Parliament Monsoon Session 2021

गदारोळामुळे रखडले कामकाज संसदेचे, मात्र पैसा गेला जनतेचा! वाचा सविस्तर

19 जुलैपासून सुरु असलेल्या संसदेतील खोळंब्यामुळे जनतेचे 133 कोटी रुपये वाया

monsoon-session-2021-more-than-133-crore-wasted-due-to-adjourned-parliament-session

नवी दिल्ली : संसदेत पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session 2021) 19 जुलैपासून सुरुवात झाली. यामध्ये पावसाळी अधिवेशनात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल आणि अनेक विधेयके पास होतील, अशी आशा केंद्र सरकारला होती. मात्र अधिवेशनात वेगळाच गोंधळ पाहायला मिळाला. पण पेगासस हेरगिरी आणि अन्य मुद्यांवरून विरोधकांनी केंद्र सरकारची पुरती कोंडी केली. त्यामुळे संसदेचे कामकाज अनेकवेळा ठप्प करण्यात आले. (More than 133 crore wasted due to adjourned parliament session 2021)

पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session 2021) 19 जुलैपासून आतापर्यंत दोन्ही सभागृहात मिळून केवळ 18 तास कामकाज झाले आहे. संसदेतील कामकाज जवळपास 107 तास चालणे अपेक्षित होते, तसे मात्र होताना दिसत नाही. संसदेतील कामकाज ठप्प झाल्याने परिणामी देशाच्या तिजोरीला 133 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे नुकसान झाले आहे.

लोकसभेच्या चालू अधिवेशनात 19 जुलैपासून आतापर्यंत केवळ 7 तास कामकाज झाले असून लोकसभेत आतापर्यंत 54 तास काम करता आले असते.

तसेच दुसरीकडे, वरिष्ठ सभागृहात म्हणजेच राज्यसभेतही हीच स्थिती पाहायला मिळाली आहे. याठिकाणीही केवळ 11 तास काम केले गेले आहे. तर इथेही सुमारे 53 तास काम केले जाऊ शकत होते. म्हणजेच दोन्ही सभागृहात वाया गेलेल्या तासांचा एकत्रित हिशोब लावला असता, एकूण 89 तास वाया गेले आहेत. दरम्यान, जनतेच्या 133 कोटी रुपयांहून अधिक पैसे या गदारोळामुळे वाया गेल्याचा अंदाज सूत्रांकडून व्यक्त केला गेला आहे.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button