Parliament Monsoon Session 2021

राज्यसभेच्या वेलमध्ये उतरून गोंधळ घालणाऱ्या टीएमसी पक्षाच्या सहा खासदारांचे दिवसभरासाठी निलंबन

गोंधळ निर्माण करणाऱ्या खासदारांना नियम 255 अंतर्गत सभागृह सोडण्यास सांगितले

loksabha-monsoon-assembly-tmc-mp-suspended-over-pegasus-spyware

नवी दिल्ली : राज्यसभेत पेगॅसस वादावर गदारोळ निर्माण करणाऱ्या तृणमूल काँगेसच्या सहा खासदारांना (TMC MP Suspended) निलंबित करण्यात आले आहे. हे सहा खासदार वेलमध्ये उतरुन पेगॅससच्या मुद्द्याविरोधात (Pegasus Spyware) घोषणा देत होते. आज (5 ऑगस्ट) सकाळी राज्यसभेचे अधिवेशन सुरू झाले तेव्हा या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले.

राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी (Rajyasabha Monsoon Assembly 2021) वारंवार बोलूनही निलंबित खासदार शांत न झाल्याने त्यांना पुर्ण दिवसासाठी निलंबित करण्यात आले. राज्यसभा अध्यक्षांनी सदस्यांना आपल्या ठिकाणी स्थानापन्न होऊन कार्यवाही पुढे जाऊ देण्याचे आवाहन केले होते. अध्यक्ष म्हणाले, फलक दाखवणाऱ्या सदस्यांची नावे नियम 255 अन्वये प्रकाशित केली जातील आणि त्यांना दिवसभर निलंबित केले जाईल. असा सूचना वजा इशारा देऊनही गोंधळ थांबला नाही.

त्यामुळे अध्यक्षांनी गोंधळ निर्माण करणाऱ्या खासदारांना (TMC MP Suspended) नियम 255 अंतर्गत सभागृह सोडण्यास सांगितले. राज्यसभेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, टीएमसी खासदार डोला सेन, नदिमुल हक, अर्पिता घोष, मौसम नूर, शांता छेत्री आणि अबीर रंजन बिस्वास यांना गैर वर्तनासाठी एकदिवसीय सभागृहाच्या कामकाजामधून माघार घेण्यास सांगितले आहे.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button