दिवसभरात सुमारे अकरा लाख नागरिकांचे लसीकरण – कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाची अतुलनीय कामगिरी

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत दिवसभरात 10 लाख 96 हजार  नागरिकांना लस (Vaccination Record in Maharashtra) देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून […]

Continue Reading

सोने-चांदीच्या भावांमध्ये आज किंचित वाढ – गेल्या आठवड्याभरापासून 4100 रुपयांपर्यंत किंमतीत घट

नवी दिल्ली : सोमवारी सोने आणि चांदीच्या (Gold Silver Rate Today) किंमतींत संमिश्र कल दिसून आला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये, ऑक्टोबर, 2021 मध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याची किंमत 71 रुपये किंवा 0.15 टक्क्यांनी वाढून 47,011 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. मागील सत्रात, ऑक्टोबर 2021 मध्ये सोन्याचा दर 46,940 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्याचप्रमाणे डिसेंबर 2021 मध्ये […]

Continue Reading

पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण – चांदीच्या दरात हलकी वाढ

नवी दिल्ली : भारतीय बाजारात आज सोन्याच्या किंमतीत (Gold/Silver Price Today) किंचित घसरण झाली. मंगळवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने 0.03 टक्के घसरलेआहे. मात्र, चांदीचे भाव वाढत आहेत. चांदीचा भाव 0.24 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या व्यापार सत्रात, सोने 0.47 टक्क्यांनी वाढले होते, तर चांदीने 0.54 टक्क्यांची वाढ नोंदवली होती. गेल्या आठवड्यात सोन्याची किंमत 45,600 रुपये प्रति […]

Continue Reading

एक कोरोनाबाधित सापडला, म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन लागला – तीन दिवसांसाठी देशभरात कडक लॉकडाऊन लागू, पंतप्रधानांचा निर्णय

ऑकलंड : मंगळवारी एक मोठा निर्णय घेत न्यूझीलंड सरकारने (New Zealand Lockdown) किमान तीन दिवसांसाठी देशभरात कडक लॉकडाऊन लागू केले. वास्तविक, देशात सहा महिन्यांनंतर, लोकांमध्ये प्रथमच, कोरोनाचे पहिले प्रकरण समोर आले आहे. पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी साथीचा अंत करण्यासाठी लोकांना मदतीचे आवाहन केले आहे. आर्डर्न म्हणाले की, कोरोनाला सामोरे गेले नाही तर इतर ठिकाणी काय […]

Continue Reading

अफगाणिस्तान स्फोटांनी हादरले – 80 जण ठार, 200 जण जखमी

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सायंकाळी एकापाठोपाठ एक झालेल्या दोन (Afghanistan Airport Blast) बॉम्बस्फोटात 80 जण ठार झाले. तर 200 जण जखमी झाले. अमेरिकेतील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात अमेरिकेच्या बारा मरिन कमांडों मृत पावले असल्याचा संशय आहे. काबूल विमानतळाबाहेर साडेसातच्या सुमारास इसीसच्या दहशतवाद्यांनी हा आत्मघाती हल्ला केला […]

Continue Reading

“भारत माता की जय…”, घोषणा देत अफगाणिस्तानहून भारतीय मायदेशी परतले! – अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांसाठी अमेरिकेचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवरून 87 भारतीयांना घेऊन वायू सेनेचे एक विशेष विमान पहाटे दिल्लीत (Indian Evacuation From Afghanistan) दाखल झाले. या नागरिकांना शनिवारी भारतीय वायू सेनेच्या विमानाद्वारे सर्वप्रथम काबूलवरून ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथे नेले गेले होते. या पाठोपाठच भारतीय वायू सेनेच्या C-17 या विमानाने देखील काबूलहून 168 नागरिकांना घेऊन, उड्डाण घेतलेले आहे. ज्यामध्ये 197 भारतीय […]

Continue Reading

1984 च्या शीख दंगली प्रकरणी दोषी असलेल्या सज्जन कुमारच्या जामिनाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे ‘हे’ महत्त्वाचे निर्देश – सज्जन कुमार यांनी दाखल केलेल्या वैद्यकीय आधारावर जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने दिले निर्देश

नवी दिल्ली : 1984 च्या शीख दंगली प्रकरणी (1984 Anti-Sikh Riots) दोषी असलेले दिल्लीचे माजी खासदार आणि काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार यांनी दाखल केलेल्या वैद्यकीय आधारावर जामीन अर्जावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला सज्जन कुमारची वैद्यकीय स्थिती तपासल्यानंतर 6 सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. खरं तर, कोरोना […]

Continue Reading

विधानसभा निवडणुकीतील ट्रान्सजेंडर उमेदवार RJ अनन्या कुमारी हिची आत्महत्या – वजायनोप्लास्टी शस्त्रक्रियेत चूक झाल्याची केली होती तक्रार

केरळ : केरळ विधानसभा निवडणुकीतील पाहिल्या ट्रान्सजेंडर उमेदवार RJ अनन्या कुमारी अलेक्स (ananya Kumari alex) हिचा राहत्या घरी मृतदेह आढळला आहे. अनन्याचा मृतदेह कोची येथील फ्लॅटच्या छताला लटकलेला आढळल्याने तिने आत्महत्या केल्याचे म्हंटले जात आहे. अनन्या केरळची पहिली ट्रान्सजेंडर RJ होती. अनन्याने अलीकडेच एका डॉक्टर आणि खासगी रुग्णालयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता आणि या […]

Continue Reading

पुणे जिल्ह्यात 70 लाख कोविड लसीकरणाचा टप्पा पार – अधिकाधिक लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न : उपमुख्यमंत्री अजित पवार

टास्क फोर्स तज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच शाळांबाबतचा निर्णय ग्रामीण भागात धडक सर्वेक्षण मोहिमेंतर्गत 2 लाख 83 हजार 327 नमुना तपासणी पूर्ण प्रत्येक तालुक्यात एक ऑक्सिजन प्लँट खाजगी रुग्णालयातील लसींवर प्रशासनाचे नियंत्रण तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरुन प्रशासन सज्ज, नागरिकांनीही नियमांचे पालन करावे पुणे : जिल्ह्यात कोवीड प्रतिबंधक लसीकरणाचा 70 लाखांचा टप्पा पार (Pune Vaccination Update) झाला आहे. […]

Continue Reading

कलिना विद्यापीठ परिसरात मुलांसाठी कोविड काळजी केंद्र सुरु – कोविडचा धोका टाळण्यासाठी जबाबदार नागरिक बना – मुख्यमंत्री

मुंबई : कोविडचा धोका टळलेला नाही हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून वागा (Children Covid Center Mumbai) असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयटी पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या  मुलांसाठीच्या कोविड काळजी केंद्राचे लोकार्पण करताना बोलत होते. केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल […]

Continue Reading