News

महाराष्ट्राचा दुसरा अर्थसंकल्प जाहीर – महत्त्वाचे ‘दहा’ मुद्दे जाणून घ्या

आज महाराष्ट्राचा दुसरा अर्थसंकल्प अधिवेशना मध्ये जाहीर करण्यात आला

 • महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन अर्थसंकल्पाला प्रारंभ.
 • अधिवेशनासाठी सर्वांची कोरोना चाचणी पूर्ण.
 • विविध क्षेत्रात तरतुदी करण्यात आल्या.
 • अनेक योजनांची घोषणा करण्यात आली.maharashtra-budget-2021-अधिवेशना

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशना मध्ये महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. अजित पवार यांनी अधिवेशनाचा प्रारंभ राज्यातील माता-भगिणी, युवती-विद्यार्थींना शुभेच्छा देऊन केला. पुढे अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी अधिवेशनाला हजर राहणाऱ्या आमदार, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार अशा सर्वांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक होते. एका आठवड्यात सलग चार दिवस अधिवेशनाचे कामकाज चालवायचे. त्यानंतर तीन दिवस सुट्टी द्यायची. त्यानंतर अधिवेशनाच्या पुढील आठवड्यात कामकाज सुरु करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांची कोरोना चाचणी करायची. त्यामुळे जर तीन दिवसांच्या कालावधीत कोणाला कोरोनाची लागण झाली, तर त्यांना अधिवेशनात येण्यापासून रोखता येईल. अशा पद्धतीने आठवड्यातून चार दिवस कामकाज आणि तीन दिवस सुट्टी या फॉर्म्युल्यानुसार तीन ते चार आठवडे अधिवेशन चालवता येईल, असे नियोजन राज्य सरकारने केले होते.

हे हि लेख वाचा – राज ठाकरेंनी दिला नाणार प्रकल्पाला पाठिंबा; विरोधाचे रूपांतर समर्थनात

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे :
 • शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात जागा मिळाली असून शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे कर्जही बिनव्याज मिळणार आहे.
 • पर्यटन विभागासाठी अर्थसंकल्पात 1 हजार 367 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 • महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात आली असून, नवीन घर विकत घेताना गृहिणीच्या नावावर केल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत दिली जाणार असल्याची ‘राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी’ योजनेची घोषणा करण्यात आली.
 • अजित पवार यांनी राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये नव्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेची घोषणा केली.
 • महानगर पालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी येत्या 5 वर्षांत 5 हजार कोटींची तरतूद करण्यात आली.
 • पुण्यातील ससून रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांसाठी, निवासस्थानांच्या बांधकामासाठी अर्थमंत्र्यांनी 28 कोटी 22 लाख अंदाजित खर्चाला मान्यता दिल्याची घोषणा केली.
 • ईस्टर्न फ्रीवेला स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे.
 • तोट्यात असलेल्या एसटीला 1400 कोटींची मदत मिळणार आहे.
 • उद्योग विभागासाठी 3500 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच, 25 हजार उद्योगांना मदत करण्याची तरतूद देखील अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी, आमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button