Navi Mumbai

भाजी मार्केटमध्ये श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी लोकांची गर्दी

व्यापऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण, पालेभाज्या मात्र महागल्या

shravan-month-2021-on-the-first-day-of-shravan-month-in-the-vegetable-market

नवी मुंबई : श्रावण महिन्याच्या पाहिल्याच सोमवारी (Shravan Month 2021) नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये 700 गाड्यांची आवक झाली आहे. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदीसाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोमवार आल्याने अनेकांचा उपवास असतो.

श्रावण सोमवारच्या पहिल्या दिवशी (Shravan Month 2021) संध्याकाळी उपवास सोडताना जेवणात कमीत कमी 5 भाज्यांचा समावेश केला जातो. त्यामुळे थोड्या-थोड्या प्रमाणात विविध भाज्या खरेदी केल्या जात असतात. यामध्ये बहुतांश पालेभाज्यांना प्राधान्य दिले जात असल्याने मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे पालेभाज्या महाग झाल्या असल्याचे पाहायला मिळत आहे.

पहाटे पासून किरकोळ विक्रेत्यांनी भाजी खरेदीसाठी बाजारात मध्य रात्री सुरु होणाऱ्या मार्केटमध्ये गर्दी केली होती. यावेळी पालेभाजी खरेदीकडे ग्राहकांची झूबंड पाहायला मिळाली. तर उपवास केळीच्या पानांवर सोडण्याची प्रथा असल्याने आज केळीच्या पानांचेही भाजीपाला बाजारात आगमन झाले आहे. केळीची पाने खरेदी करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. अशावेळी केळीच्या एका पानाला 5 रुपये दर आकारला जात असून केळीच्या पानासह विविध पालेभाज्या खरेदी करताना ग्राहक दिसून आले.

ग्राहकांची वाढती गर्दी पाहता व्यापारी समाधानी

अनेक दिवसांमधून एपीएमसी मार्केटमधील कांदा-बटाटा मार्केट व्यतिरिक्त इतर सर्वच मार्केटमध्ये खरेदीला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. श्रावण महिन्यात अधिक लोक मांसाहार बंद करून शाकाहाराला पसंती देताना पाहायला मिळतात. त्यामुळे अन्नधान्यासह सर्वच मार्केटमध्ये गर्दी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दरवर्षी संपूर्ण श्रावण महिना भाजीपाला आणि फळ खरेदीला ग्राहक पसंती देत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button