Navi Mumbai

नवी मुंबई महानगर पालिका आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या तयारीला 

नवीन माता-बाल संगोपन केंद्रे ; ऐरोली, नेरुळ सार्वजनिक रुग्णालयांचे समर्पित कोरोना रुग्णालयाचा दर्जा

nmmc-health-department-to-be-strengthen-soon

नवी मुंबई : कोरोनाकाळात पालिकेने नवी मुंबईकरांसाठी (NMMC Health Department) आरोग्य यंत्रणा सक्षम आणि अत्याधुनिक करण्याचा विडा उचलला आहे.  नवी मुंबई महानगरपालिका त्याकरिता पावले उचलली जात आहेत.  कोपरखैरणे दिघा येथे प्रत्येकी दोन माता-बाल संगोपन केंद्र उभारणार आहे.

तसेच महापे एमआयडीसी या नागरी क्षेत्रात आरोग्य केंद्र उभारले जाणार आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सुसज्जता म्ह्णून ऐरोली आणि नेरुळ येथील सार्वजनिक रुग्णालये ही करोना रुग्णालयात बदल करून इतर रुग्णांसाठी तुर्भे आणि बेलापूर येथे त्यांची व्यवस्था केली जाणार आहे. माता बाल संगोपन केंद्रे अद्ययावत करून त्यामार्फत सर्वसामान्यांची गरज भागवली जाणार आहे.

नागरी आरोग्य केंद्र (NMMC Health Department) ही पालिकेच्या आरोग्य विभागाचा पाया आहेत. अलीकडच्या कोरोना संर्सग काळात स्थानिक पातळीवर चाचण्या आणि प्रबोधनाचे महत्त्वाचे काम या नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून विभागातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत करण्यात आले आहे. कोरोनाच्या दोन लाटांचा सामना करत तिसऱ्या लाटेसाठी सज्ज होण्याकरिता पालिका  नवीन आरोग्य सुुविधा निर्माण करत आहे. वाशी मधील सिडको प्रदर्शन केंद्रातील कोविड काळजी केंद्र  राज्यात प्रशंसनीय ठरले आहे.

दुसरी लाट किंचित कमी आल्या नंतर कोविड केंद्र बंद करण्यात आली होती. मात्र या संकट काळात भरती करून घेतलेले डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी अद्याप सेवेत कायम ठेवण्यात आले आहेत. ही तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून डॉक्टरांची फळी तयार केली आहे. यांना पालिका सेवेत सामावून घेण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील लोकसंख्या 17 ते 18 लाखांच्या घरात गेली आहे.

परिणामी आरोग्य यंत्रणा सक्षम (NMMC Health Department) असण्याची प्रशासनाला गरज वाटते. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. कोपरखैरणेसारख्या शहरी भागात माथाडी कामगार मोठ्या संख्येने असल्याने अद्ययावत आरोग्य केंद्रांची आवश्यकता लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने या भागात एक माता बाल संगोपन केंद्र असणार आहे.

नवी मुंबईच्या पूर्व बाजूस असलेल्या एमआयडीसीतील झोपडपट्टी भागामुळे तिथली अस्थित्वात असलेली आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे महापे मध्ये एक नागरी आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मंजूर केला आहे. एमआयडीसीतर्फे अधिकृतरित्या भूखंड उपलब्ध झाल्यास पालिकेला आरोग्य आणि शिक्षण सुविधा देताना अडसर निर्माण होणार नाही.

नवी मुंबई महानगरपालिकेने कोविड संसर्ग काळात तात्पुरत्या स्वरूपातील आरोग्य यंत्रणा उभारली आहेत. मात्र कायम स्वरूपी यंत्रणा असणे गरजेचे असल्याने दिघा आणि कोपरखैरणेत  माता बाल संगोपन केंद्र उभारणीच्या निविदा घेण्यात येणार आहे. एमआयडीसीतही अशा केंद्राची आवश्यकता आहे.

– संजय देसाई, शहर अभियंता, नमुंमपा

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button