Navi Mumbai
Trending

Navi Mumbai Police Transfer : नवी मुंबई पोलीस आयुक्त अंतर्गत वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि निरीक्षकांच्या बदल्या

आयुक्तांनी केल्या 37 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीसनिरीक्षक दर्जाच्या (Navi Mumbai Police Transfer) 37 पोलीस निरीक्षकांच्या पोलीस आयुक्त विपीनकुमार यांना आस्थापन मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार गुरुवारी (19 ऑगस्ट) रात्री बदल्यांचे आदेश काढले.

navi-mumbai-police-transfer-transfer-of-senior-police-inspectors-and-inspectors-under-navi-mumbai-police-commissioner

यामध्ये क्राईम ब्रँच, वाहतुक, नियंत्रण कक्ष, पोलीस ठाणे, बीडीडीएस, अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. वाहतुक विभागातून बदली केलेल्या अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्ष, बीडीडीएस, अतिक्रमण विभागात तर काही अधिकाऱ्यांच्या पोलीस ठाण्यात बदल्या (Navi Mumbai Police Transfer) केल्या आहेत. त्यामध्ये क्राईम ब्रँचचे विजय काबदाने यांची पनवेल शहरला बदली करण्यात आली.

मोरा सागरीचे पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांची खारघर पोलीस ठाणे तर शत्रुघ्न माळी नियंत्रण कक्ष ते क्राईम बॅच युनिट तीन, नितीन गिते रबाळे एमआयडीसी ते तुर्भे वाहतुक, अभिजीत मोहिते वाहतुक पनवेल ते मोरा सागरी, संजय चव्हाण सीबीडी ते नेरूळ पोलीस ठाणे, महेंद्र मोरे याना मनपा अतिक्रमण मुदतवाढ, अनंत चव्हाण सिडको अतिक्रमण, भानदास खटावकर वेल्फेर, माणिक नलावडे यांना विशेष शाखा, भरत कामत बीडीडीएस, दत्तात्रय किंद्रे म्हापे सानपाडा पोलीस ठाणे, बाबुराव देशमुख वाशी वाहतुक, भागोजी ओटी रबले पोलीस ठाणे, संजय नाळे पनवेल वाहतूक, उमेश गवळी सीबीडी पोलीस ठाणे, अशोक गायकवाड गव्हाण वाहतूक, गोपाल कोळी रवाले वाहतूक, सुधीर पाटील रबाले एमआयडीसी प्रभारी, जगदीश कुलकर्णी उरण वाहतूक तर मध्यवर्ती शाखा पीआय कोल्हटकर गुन्हे प्रशासन अशा बदल्या करण्यात आल्या.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button