Navi Mumbai

गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांच्या संख्येत भर

यावर्षी 150 ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था

navi-mumbai-artificial-lakes-increase-the-number-of-artificial-lakes-for-ganapati-visarjan

नवी मुंबई : कोरोनामुळे यावर्षी गणेशोत्सवात (Navi Mumbai Artificial Lakes) गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर भर दिला जाणार असून यावर्षी 150 ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी शहरात 135 कृत्रिम तलावांवर विसर्जन करण्यात आले होते.

गणेशोत्सवासह पुढील काही दिवसांत येऊ घातलेल्या मोहरम, गोपाळकाला, अनेक सणासुदीच्या काळात शहरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट आहे. शहरातील नागरिकांनी गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात (Navi Mumbai Artificial Lakes) गणेशविसर्जनासाठी बनवण्यात आलेल्या कृत्रिम तलावांना चांगला प्रतिसाद दिला होता.

पर्यावरणच्या दृष्टीने पालिकेला मोलाचे सहकार्य करून नागरिकांनी गेल्या वर्षी सजगता दाखवली होती. यावर्षी (2021) गणेशोत्सवासाठी कोरोनाच्या काळात प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येणार असून त्यासाठी पालिका , वाहतूक पोलीस आणि शहरातील गणेश मंडळे यांचेही सहकार्य घेतले जाणार आहे.

नवी मुंबईत एकूण 23 पारंपरिक विसर्जनस्थळे आहेत. परंतु या सणासुदीच्या काळात लोकांची गर्दी टाळणे हे एक मोठे आव्हान पालिकेपुढे असून त्यासाठी गणेशोत्सवाबरोबरच विसर्जनावेळी गर्दी विखुरण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करून जास्तीत जास्त कृत्रिम तलाव बनवण्याचे पालिकेचे नियोजन असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

नवी मुंबई महापालिकेच्या अभियंता विभागाकडे नागरिकांकडूनही कृत्रिम तलावाबाबत बऱ्याच मागण्या येऊ लागल्याने पालिकेनेही याबाबत प्राथमिक नियोजनाला सुरुवात केली आहे. (Navi Mumbai Artificial Lakes)

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button