Navi Mumbai

नवी मुंबईतील 2 लाख नागरिक लोकल प्रवासास पात्र

कोरोनाच्या दुसऱ्या डोससाठी नागरिकांची धावाधाव

local-for-generals-2-lakh-citizens-of-navi-mumbai-eligible-for-local-travel

नवी मुंबई : कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना राज्य सरकारने येत्या 15 ऑगस्टपासून लोकल रेल्वेच्या प्रवासाची मुभा (Local For Generals) दिली आहे. त्यानुसार नवी मुंबई शहरातील तब्बल 2 लाख 37 हजार 513 जणांनी कोव्हिडच्या लसीचा दुसरा डोस घेतल्याने आता ते लोकल प्रवासाला पात्र ठरणार आहेत.

आवश्यक कालावधी उलटूनही पहिला डोस घेतल्यानंतर अनेकांनी दुसरा डोस अजून घेतलेला नाही; तर काहींनी दुसरा डोस घेण्यासाठी टाळाटाळ केली; मात्र दोन्ही डोस घेतल्याशिवाय रेल्वे प्रवास शक्य नसल्याने अशा लाभार्थींनी दुसरा डोस घेण्यासाठी धावाधाव सुरु केली असल्याची आहे. मात्र, लसींचा पर्याप्त साठा उपलब्ध होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.

नवी मुंबईत 9 लाख 39 हजार 452 जणांचे लसीकरण

नवी मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल 9 लाख 39 हजार 452 लोकांना लशींचा डोस दिला आहे. त्यापैकी 7 लाख एक हजार 939 लोकांनी पहिला डोस घेतला असून नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळच लस घेणे सुविधाजनक व्हावे याकरिता महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार सद्यःस्थितीत 91 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.

तिसऱ्या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचा नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. तसेच, यापुढील काळात अधिक प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास कोरोना लसीकरणाला वेग (Local For Generals) देण्यासाठी शंभरहून अधिक लसीकरण केंद्रे सुरु करण्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे याकरिता प्रयत्नशील असून ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे त्यांना विहित कालावधीत दुसरा डोस उपलब्ध करुन देण्याची काळजी घेतली जात आहे.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button