Navi Mumbai

कोंकण भवनात उत्स्फूर्त प्रतिसादात रक्तदान शिबिर संपन्न

शिबिरासाठी दिलेल्या उत्कृष्ट सेवा व सहयोगाबद्दल आभार

konkan-bhawan-blood-donation-camp

नवी मुंबई : सहसंचालक, नगर रचना, (Konkan Bhawan Blood Donation Camp) कोकण विभाग, नवी मुंबई आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.13 ऑगस्ट रोजी कोंकण भवन येथील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या महिला भोजन कक्षामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचा शुभारंभ (Konkan Bhawan Blood Donation Camp) महाराष्ट्र नगर रचना विभागाचे संचालक सुधाकर नांगनुरे यांच्या हस्ते झाला. यावेळी सहसंचालक नगर रचना कोंकण विभाग, जितेंद्र भोपळे, नगर रचनाकार राजेंद्र चव्हाण, कोंकण भवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी सर्वप्रथम रक्तदान करुन या शिबिराला सुरुवात केली.

टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सध्या कर्करोगाने बाधित रुग्णांवर उपचार घेत असलेल्या रुग्‍णांना तसेच कोविड-19 या संसर्गजन्य रोगाने बाधित रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत आहे. या अनुषंगाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोंकण भवन व परिसरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या संख्येने रक्तदान करुन या शिबिरात सहभाग नोंदविला.

रक्तदान शिबिर (Konkan Bhawan Blood Donation Camp) आयोजित करताना आयोजकांनी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क आणि सॅनिटाईझरचा योग्य वापर केला. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या रक्तपेढीने या उपक्रमास उस्त्फुर्त प्रतिसाद दिला.

यावेळी टाटा मेमोरियल हॉस्पिटल परळ शाखेतून आलेल्या सर्व रक्त संक्रमण अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहसंचालक, नगर रचना, कोकण विभाग, नवी मुंबई यांनी शिबिरासाठी दिलेल्या उत्कृष्ट सेवा व सहयोगाबद्दल त्यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button