Navi Mumbai

कोरोना योद्ध्यांना नवी मुंबई सिडकोकडून अनोखा सलाम, वाचा सविस्तर!

सिडकोच्या योजनेतून कोरोना योद्ध्यांना मिळणार स्वस्तात घरपण

cidco-corona-worrier-scheme-corona-warriors-will-get-affordable-housing-from-cidcos-scheme

नवी मुंबई : नवी मुंबईतील सिडकोने कोरोना योद्ध्यांसाठी एक मोठा निर्णय (CIDCO Corona Worrier Scheme) घेतला आहे. गेल्या दीड वर्षापासून राज्यातील कोरोना संकट परतवून लावण्यासाठी अविरतपणे झटणाऱ्या कोरोना योद्ध्यांना नवी मुंबईत स्वस्तात घरे मिळणार आहेत.

सिडकोच्या माध्यमातून कोरोना योद्ध्यांच्या कामगिरीबाबत कृतज्ञता म्हणून त्यांच्यासाठी घरे राखीव ठेवण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. या आदेशानुसार सिडकोच्या विशेष गृहनिर्माण योजनेत कोरोना योद्ध्यांसाठी राखीव घरे ठेवण्यात आली असून त्याच्या लाभ त्यांना घेत येणार आहे. (Corona warriors will get affordable housing from CIDCO’s scheme)

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत सिडकोकडून संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोनायोद्धे व गणवेशधारी कर्मचाऱ्यांकरिता नवी मुंबईच्या 5 नोड्समध्ये 4488 घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली व द्रोणागिरी या 5 परिसरांमध्ये ही घरे असणार आहेत.

सिडकोकडे एकूण 4488 घरांपैकी 1088 घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (CIDCO Corona Worrier Scheme) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी, ईडब्लूएस आणि उर्वरित 3400 घरे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आहेत. तसेच, वैधानिक तरतुदींनुसार काही घरे भटक्या जमाती, विमुक्त जाती,अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग प्रवर्गांकरिता राखीव आहेत. https://lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावरून आपण योजनेशी संबंधित अधिक माहिती घेऊ शकतो.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button