National
Trending

Kalyan Singh : पंतप्रधान मोदींनी कल्याण सिंह यांना वाहिली श्रद्धांजली

जनकल्याण हा कल्याण सिंह यांचा जीवनमंत्र होता - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनऊ गाठून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह (Kalyan Singh) यांचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर  श्रद्धांजली वाहिली. पीएम मोदी रविवारी लखनऊच्या मॉल एव्हेन्यूवरील सिंह यांच्या निवासस्थानी पोहोचले, जिथे त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले आहे.

prime-minister-modi-pays-homage-to-kalyan-singh

पंतप्रधानांनी त्यांना अंतिम श्रद्धांजली (Kalyan Singh Last Tribute) वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रदेश भाजप अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह उपस्थित होते.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री 9:15 वाजता लखनौच्या SGPGI (संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) येथे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. कल्याण सिंह बराच काळ आजारी होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले – देशाने एक सक्षम नेता गमावला आहे

कल्याण सिंह यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाने एक सक्षम नेता गमावला आहे. मी भगवान प्रभू श्री राम यांच्या चरणी प्रार्थना करतो की भगवान राम कल्याण सिंह जी यांना त्यांच्या चरणी बसवावे. या दुःखाच्या घडीला प्रभू राम त्यांच्या परिवाराला हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button