National

DCP Priyanka Narnaware : MCPT Phase 3 अभ्यासक्रमात डीसीपी डॉ. प्रियांका नारनवरे भारतात प्रथम

पुणे झोन-1 च्या डीसीपी डॉ. प्रियांका यांना मिळणार डीआयजी रँक

 

dcp-priyanka-narnaware-in-mcpt-phase-3-course-dcp-dr-priyanka-naranware-first-in-india

पुणे : हैद्राबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकादमी तर्फे घेण्यात येणाऱ्या MCPT Phase 3 (मिड करियर ट्रेनिंग प्रोग्राम) मध्ये पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे (Priyanka Narnaware DCP Pune) यांनी भारतात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.

डॉ. प्रियांका या पुणे जिल्ह्याच्या झोन 1 मध्ये सध्या पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. या ट्रेनिंग प्रोग्रॅम मध्ये डॉ. प्रियांका (Dr. Priyanka Narnaware Pune Police) यांनी 100 पैकी 85.87 गुण मिळविले आहे. यंदा झालेल्या (2021) ट्रेनिंग प्रोग्राममध्ये 104 निवडक आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये त्या देशभरातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.

त्याचबरोबर महाराष्ट्रातील एस.पी मोक्षदा पाटील (औरंगाबाद) यांनी 82.10 गुणांसह पाचवे स्थान मिळविले आहे. तसेच 11 व्या स्थानावर उत्तीण झालेले आयपीएस राकेश चंद्र कलासागर 80.05 गुण मिळाले आहेत. पोलीस कार्य सेवेत नऊ वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी ‘सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकादमी’मध्ये ही प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाते.

त्यात निवडक आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांचा (Priyanka Narnaware DCP Pune) समावेश असतो. महत्त्वाचे म्हणजे 21 राज्य आणि 6 केंद्रीय पोलीस संघटनांमधून कार्योन्मुख अधिकाऱ्यांची या प्रोग्रामसाठी निवड केली जाते. अधिकाऱ्यांमधील कौशल्य वृद्धिंगत करणे हे प्रमुख उद्दिष्ट या अभ्यासक्रमाचे आहे.

यंदाच्या 2021च्या अभ्यासक्रमासाठी 104 निवडक अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यात डॉ. प्रियांका नारनवरे यांचा (Dr. Priyanka Narnaware News) समावेश होता. त्या 2011 मधील बॅचच्या आयपीएस अधिकारी (Dr. Priyanka Narnaware Batch) आहेत. पोलीस दलात पदार्पण केल्यापासून डॉ. नारनवरे यांनी प्रथम जालना, उस्मानाबाद आणि ठाणे जिल्ह्यात सेवा बजावली आहे.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

One Comment

  1. We are proud of you .Go ahead all punekers are with you.Do not move eyes from social responsibility which is on your sholders by this post . You are doing very good job,your decisions rational and helpfull to the society. Take care, Congratulations for your success

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button