National

Museum of Liquor : ‘या’ राज्यात बनले दारुचे संग्रहालय!

देशातील पहिलेच अल्कोहोल संग्रहालय

a-liquor-museum-has-been-set-up-in-these-state

गोव्याची ओळख पोर्तुगाल, ब्राझील आणि पश्चिमेकडील रोममध्ये देखील आहे. गोवा नेहमीच या वेगळ्या ओळखीमुळे देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचे विशेष केंद्र राहिले आहे. समुद्रकिनारी असलेल्या राज्याची आणखी एक खास ओळख आहे. आणि ती म्हणजे येथील स्थानिक दारू (Museum of Liquor) ‘फेणी’. या फेणी दारुचा जीवन प्रवास सांगण्यासाठी संग्रहालय तयार केले गेले आहे. अशाप्रकारचे देशातील पहिलेच अल्कोहोल संग्रहालय आहे.

झी न्युजने वृत्तसंस्था आय.ए.एन.एस. (I.A.N.S.) च्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. स्थानिक व्यावसायिक नंदन कुडचडकर यांनी गोव्याच्या कंडोलिम गावात हे संग्रहालय बांधले आहे. कुडचडकर यांनी संग्रहालयाला ‘ऑल अबाऊट अल्कोहोल’ (Museum of Liquor) असे नाव दिले आहे. या अल्कोहोल संग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे काजूपासून बनवलेली दारु साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कलाकृती मर्तबान (चिनी मातीपासून बनलेल्या गोलाकार भांड्याचा हा एक प्रकार आहे),

जार शतकांपासून वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक काचेच्या भांड्यात दारु ठेवल्या जाते. ‘ब्राझील ते गोवा’ मद्याशी संबंधित प्रवासाची कहाणी आय.ए.एन.एस. या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नंदन कुडचडकर म्हणतात, संग्रहालय तयार करण्यामागे एक संदेश आहे. ज्यात गोव्याच्या विशेष सांस्कृतिक वारशाची कथा, विशेषत: फेणीची सुरुवात आणि ब्राझील ते गोवा या मद्याशी संबंधित प्रवासाची कहाणी सांगायची आहे. इतिहासकारांच्या मते, गोव्यातील पहिले काजूचे झाड पोर्तुगीजांनी 1700 मध्ये ब्राझीलमधून आणले होते.

ब्राझील आणि गोवा या दोन्ही देशांमध्ये ल्युसोफोनियन कलोनियलचा प्रभाव आहे. येथे, जेव्हा ब्राझीलमधून आणलेले काजूचे रोप गोव्याच्या भूमीवर लावले गेले, तेव्हा काजूसह फेणी दारूनेही गोव्याच्या खाद्य संस्कृतीत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button