Mumbai

Sero Survey 5 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सीरो सर्वेक्षण-5 सुरू

या सर्वेक्षणात एकूण 8 हजार नमुने यादृच्छिक पद्धतीने घेण्यात येणार

sero-survey-5-sero-survey-5-started-by-bmc

मुंबई : कोरोना संसर्गाचा माग शोधण्यासाठी सीरो सर्वेक्षण (Sero Survey 5) (रक्त नमुने संकलन करुन सर्वेक्षण) महत्त्वाचे ठरत आले आहे. हे लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत चार वेळा सीरो सर्वेक्षण पूर्ण केले असून आता पाचवे सीरो सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. यामध्ये एकूण 8 हजार नमुने संकलित करुन त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उच्चभ्रू वस्ती, मध्यमवर्गीय वस्ती, झोपडपट्टी, सोसायटी आदी परिसरातील रहिवाशांमध्ये किती प्रमाणात प्रतिपिंड (Antibody) तयार झाल्या, हे तपासण्यासाठी सातत्याने सीरो सर्वेक्षण (रक्त नमुने संकलन करुन सर्वेक्षण) केले जाते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने, महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत चार वेळा सर्वेक्षण (Sero Survey 5 Mumbai) करण्यात आले आहेत. पहिले व दुसरे सर्वेक्षण जुलै व ऑगस्ट 2020 मध्ये 3 प्रशासकीय विभागांमध्ये करण्यात आले, तर तिसरे सर्वेक्षण मार्च 2021 मध्ये आणि चौथे सर्वेक्षण लहान मुलांकरीता मे ते जून 2021 या कालावधीमध्ये सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये करण्यात आले.

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तसेच कोविड लसीकरण मोहीमही सुरू असल्याने, नागरिकांमध्ये प्रतिपिंड (अँटीबॉडी) चे प्रमाण पाहणे वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 24 विभागातील महानगरपालिका दवाखान्यांमार्फत पाचवे सीरो सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.

बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये निवडक वैद्यकीय व्यावसयिकांद्वारे (जनरल प्रॅक्टीशनर्स) त्यांच्या दवाखान्यात सर्वेक्षणाबाबतची कार्यवाही करण्यात येईल. या सर्वेक्षणात एकूण 8 हजार नमुने यादृच्छिक पद्धतीने (Random Sampling Method) घेण्यात येणार असून त्यांची चाचणी शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात करण्यात येणार आहे. आयडीएफसी आणि एटीई चंद्रा फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण राबविण्यात येत आहे.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button