Mumbai
Trending

Rajawadi Hospital woman Surgery : शास्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या पोटातून 8 किलो मांसाचा गोळा काढला

राजावाडी रुग्णालयात साडेतीन तास ऑपरेशन करून 8 किलो वजनाचा मासाचा गोळा बाहेर काढला

मुंबई : मुंबई उपनगरीय भागातील घाटकोपर येथे (Rajawadi Hospital woman Surgery) महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात 35 वर्षीय महिलेच्या पोटावर शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी 8 किलो वजनाचा मांसाचा गोळा काढला. शस्त्रक्रियेनंतर ही महिला रुग्ण ठणठणीत बरी झाली असून पुढील काही दिवसात ती काम सुद्धा करू शकणार आहे असे येथील डॉक्टरांनी सांगितले.

rajawadi-hospital-woman-surgery-during-the-surgery-8-kg-of-meat-was-removed-from-the-womans-abdomen

ठाणे स्थित या महिलेला गेल्या तीन वर्षांपासून (Rajawadi Hospital woman Surgery) सतत पोट दुखीचा त्रास जाणवत होता, परंतु महिलेने हा त्रास अंगावर काढला. त्यामुळे या महिलेच्या पोटात पोटात मांसाचा गोळा तयार झाल्याने तिचे पोट गर्भवती महिलेसरखी दिसू लागले होते.राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी आल्यावर डॉक्टरांनी सर्व वैद्यकीय तपासणी केली असता या महिलेच्या पोटात मांसाचा गोळा आढळून आला.

रुग्ण महिला महिला घरकाम करते, तर तिचे पती हे ठाणे पालिकेत ठेका पद्धतीवर स्वच्छतेचे काम करतात. ऑपरेशन करण्यासाठी खूप पैसे लागतील या भीतीने त्यांनी डॉक्टरांना ऑपरेशन करण्यास नकार दिला होता.
दरम्यान, डॉक्टर अजय गुजर यांनी हे ऑपरेशन राजावाडी रुग्णालयात मोफत होईल, असे सांगितल्यावर त्यांना दिलासा मिळाला आणि ते शस्त्रक्रियेस तयार झाले. त्यानंतर डॉ. अजय गुजर आणि त्यांच्या टीमने साडेतीन तास ऑपरेशन करून 8 किलो वजनाचा मासाचा गोळा यशस्वीरित्या बाहेर काढला.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button