Mumbai

उजवा हात तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या केईएममधील डॉक्टरांचा महापौरांच्या हस्ते सत्कार

लालबागच्या गणेश मूर्तीची प्रतिकृती भेट देऊन डॉक्टरांचा सत्कार

mumbai-mayor-doctor-felicitated-by-visiting-the-replica-of-ganesh-idol-of-lalbaug

मुंबई : जागतिक अवयवदान दिनाच्या पार्श्वभूमीवर उजवा हात तसेच मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या केईएममधील डॉक्टरांचा सत्कार महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor) यांच्या हस्ते लालबागच्या गणेश मूर्तीची प्रतिकृती भेट देऊन आज (14 ऑगस्ट 2021) रोजी केईएम रुग्णालयात करण्यात आला.

याप्रसंगी स्थापत्य समिती अध्यक्ष (शहर) दत्ता पोंगडे, नगरसेवक सचिन पडवळ, नगरसेविका श्रीमती सिंधुताई मसुरकर, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख व संबंधित डॉक्टरवृंद उपस्थित होते. महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor) प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाल्या की, मेंदूच्या आजाराने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केईएम रुग्णालयातील दोन रुग्णांवर एकाच वेळी अवयव प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

यामध्ये एका रुग्णाला उजवा हात प्रत्यारोपण करण्यात आला तर दुसऱ्या रुग्णाला मूत्रपिंड (किडनी) ही प्रत्यारोपण करण्यात आली. उजवा हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही जवळपास 24 तास चालली. अवयवदान प्रत्यारोपणाचे मुंबईत दोन परवानाधारक रुग्णालय असून त्यापैकी केईएम हे एकमेव शासकीय रुग्णालय असल्याचे महापौरांनी सांगितले.

एका रुग्णाला उजवा हात प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयात प्रथमच करण्यात आली असून या सर्व डॉक्टरांचा आम्हाला अभिमान असल्याचे महापौरांनी सांगितले. अवयव दान करणाऱ्यांमध्ये दानशूरपणा वाढावा हा संदेश या शस्त्रक्रियेतून मिळाला असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी, महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor) यांच्या हस्ते उजव्या हातावर यशस्वी प्रत्यारोपण करणाऱ्या प्लास्टिक सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ.विनिता पुरी व त्यांच्या टीमचा प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी सत्कार करण्यात आला.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button