Mumbai

सामान्य मुंबईकरांसाठी मुंबई लोकलबद्दल एक वाईट बातमी!

लोकल प्रवासातील वाढती संख्या रोखण्यासाठी रेल्वेने उचलले नवे पाऊल

मुंबई : मुंबई लोकलने (Mumbai local Train update) प्रवास करू इच्छिणाऱ्या मुंबईकरांसाठी एक वाईट बातमी आहे. अत्यावश्यक सेवेतील कंपन्या, आस्थापनांची बनावट ओळखपत्रे बनवून मुंबईतील लोकल रेल्वेने प्रवास करणार्‍या बोगस कर्मचार्‍यांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास देण्यासाठी संकेतस्थळ बनविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाच लोकल प्रवास करता येणार आहे. याकरिता त्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

मुंबई लोकलने (Mumbai local Train update) सध्या दररोज सरासरी 30 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. यामध्ये मध्य रेल्वेवर 18 लाख, तर पश्‍चिम रेल्वेवर 12 लाख प्रवाशांचा समावेश आहे. मात्र, मुंबईतील केंद्र, राज्य आणि विविध पालिकांच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची संख्या 17-18 लाखांच्या घरात आहे. त्यामुळे सध्या 40 ते 50 टक्के प्रवासी बनावट ओळखपत्र बनवून प्रवास करत असल्याचा अंदाज आहे.

mumbai-local-train-update-travelling-to-be-even-more-strict

मुंबईत खोपोली, पनवेल, विरार, बदलापूर , कर्जत येथील नागरीक कामासाठी येतात. लोकल प्रवास हा सर्वात जलद आणि स्वस्त असल्याने बनावट ओळखपत्रांवर प्रवासी लोकल प्रवास करीत आहेत. त्यामुळे लोकलची गर्दी वाढते आहे.यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास म्हणजेच क्यूआर प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बोगस प्रवाशांना चाप लागणार आहे. यासाठी राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवले आहे.

सामान्य प्रवाशांना एक फेब्रुवारीपासून वेळेत लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. परंतु मार्च महिन्यापासून राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातल्याने 15 एप्रिलपासून पुन्हा सामान्य मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर निर्बंध घालण्यात आले. बनावट ओळखपत्रावर प्रवास करणार्‍या प्रवाशांविरुद्ध रेल्वेची धडक मोहीम सुरू आहे. पश्चिम रेल्वेने गेल्या तीन महिन्यांत 740 जणांवर कारवाई करून 3 लाख 70 हजारांचा दंड वसूल केला आहे.तर मध्य रेल्वेच्या गेल्या पंधरा दिवसांत 702 प्रकरणांमध्ये साडेतीन लाखांचा दंड आकारला आहे.

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा. 

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button