Maharashtra

कोरोना काळात प्रत्येक जीव महत्त्वाचा : पालकमंत्री छगन भुजबळ

येवला शहरातील 4 कोटींच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

नाशिक : कोरोना अद्याप संपलेला नाही. जगभरात अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. कोरोना काळात आपल्या देशातील तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीचा जीव आपल्याला महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्वांनी आपआपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. (Chhagan Bhujbal at Nashik)

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला शहरात 4 कोटी 1 लाख विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पार पडले. त्यावेळी भुजबळ बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, नगरसेवक दीपक लोणारी, प्रवीण बनकर, राजश्री पहेलवान, प्रांत अधिकारी सोपान कासार, बांधकाम सभापती शेख निसार अह. सगीर अह, कार्यकारी अभियंता प्रशांत सोनार, उपअभियंता उमेश पाटील यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal at Nashik) म्हणाले की, कोरोनाच्या कालावधीतही आपण विकासाची कामे सुरू ठेवली आहेत. अनेक विकासाची कामे आपल्याला मार्गी लावायची आहे. जी विकास कामे सुरू करण्यात आलेली आहे ती तातडीने पूर्ण करण्यासाठी शासन सर्वोतोपरीने मदत करीत आहे. त्या अनुषंगाने शासनाचा प्रतिनिधी म्हणून नागरिकांचे प्रश्न सोडविल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्याचबरोबर शहर स्वच्छ ठेवणे जेवढी नगरपालिकेची जबाबदारी आहे. तितकीच जबाबदारी नागरिकांची आहे. म्हणून प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले आहे.

chhagan-bhujbal-at-nashik-for-inauguration

या विकास कामांचा झाला शुभारंभ

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते वैशिष्ट्यपूर्ण कामे विशेष अनुदान योजने अंतर्गत येवला शहरातील साई मंदिर परिसरातील हाबडे यांची पाठीमागील बाजु ते शाम पत्रा डेपो बदापूर रोडपर्यंत रस्ता, सुलभानगर येथील कृष्णाय मिसाळ यांचे घर ते घोलप यांचे घर ते कापसे यांचे घरापर्यंत रस्ता, साई मंदिर येथील कैलास बाकळे यांचे घर ते 12 मी. रुंद रस्त्यांपर्यंत रस्ता, साई मंदिर परिसरातील सरगडे यांचे घर ते कैलास देशमुख यांचे घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

तसेच प्राथमिक सोयी सुविधा योजनेअंतर्गत कामांचे भुमीपूजन रमेश खैरे (Chhagan Bhujbal at Nashik) यांचे घरपासुन ते नगर मनमाड रोडपर्यत, कालीका प्लोअर मिल ते सरकारी कंपाऊड वॉलपर्यत, निकम यांचे घरपासुन ते कदम यांचे घरापर्यत, तर श्रीराम शॉपी ते डुकले यांचे घरापर्यत भुमिगत गटार व रस्ता कॉकीटीकरण कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

तसेच विशेष रस्ता अनुदान अंतर्गत जब्रेश्वपर रस्ता (मंदिर) ते इंद्रनिल कॉर्नर पर्यंत भुमीगत गटारीसह रस्ता डांबरीकरण करणे, वैशिष्ट्यिपूर्ण कांमासाठी विशेष अनुदान अंतर्गत शिंपी गल्लीरमधील रंगु रामदास खुंट ते नामदेव व्यायामशाळा रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे, प्राथमिक सोयी सुविधा अंतर्गत श्रीराम कॉलनी भागातील रस्ते कॉक्रिटीकरण करणे या कामांचे भुमीपूजन करण्यात आले. त्याचबरोबर विशेष रस्ता अनुदान अंतर्गत जुनी माळी गल्ली रस्ता कॉक्रिटीकरण करणे, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत लुटे किराणा ते कुनाल शिंदे पर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण करणे व भुमीगत गटार बांधकाम करणे या कामाचे लोकार्पण पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button