Maharashtra

असे भ्रष्ट अधिकारी पारनेरमध्ये नकोत, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे प्रकरणी अण्णा हजारेंची महत्वाची प्रतिक्रिया

एका ऑडिओ क्लिपमुळे सध्या चर्चेत असलेल्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी केली जात आहे

राळेगणसिद्धी : लोकप्रतिनिधींच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आत्महत्येची धमकी देणाऱ्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्यानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया (Anna Hazare Statement) दिली आहे. अण्णा म्हणाले, ”असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नकोत, वेळ पडली तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन.”

anna-hazare-statement-in-parner-tehsildar-jyoti-deore-case

तहसीलदार ज्योती देवरे यांची क्लिप शुक्रवारी व्ह्यायरल होऊन आमदार लंके यांचे नाव न घेता त्यांनी लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप करीत आत्महत्येचे विचार मनात येत असल्याची धमकी दिली होती. आमदार लंके यांचे नाव घेतले नसले तरी देवरे यांचा रोख आमदार लंके यांच्यावरच होता. आमदार लंके यांच्यावर आरोप झाल्याने व देवरे यांनी आत्महत्येची धमकी दिल्याने राज्यात खळबळ उडाली होती. महाविकास आघाडीचा प्रमुख विरोधक पक्ष असलेल्या भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांनी आमदार लंके याना लक्ष्य करीत टीकेची राळ उठविली होती.

देवरे यांच्या आरोपानंतर दुपारी आमदार लंके यांनी खुलासा करीत देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्याने व्यथित होऊन त्यांनी असे बेछूट आरोप केल्याचा खुलासा केला. त्यापाठोपाठ देवरे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या चौकशीत त्या दोषी आढळून आल्या. भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपातही तथ्य आढळून आले..जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी चौकशी अहवाल विभागीय आयुक्तांना पाठविल्यानंतर देवरे यांच्यावर कारवाई प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर देवरे यांची क्लिप व्हायरल झाली होती.

देवरे यांच्या आरोपानंतर आमदार नीलेश लंके यांनी शनिवारी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare Statement) यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. देवरे यांच्याविरोधात जेष्ठ नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर झालेली चौकशी, त्यात तहसीलदार देवरे यांच्यावर ठेवण्यात आलेला ठपका, त्यातून बाहेर काढण्यासाठी आपणास रात्री, अपरात्री पाठविण्यात आलेले संदेश, यापूर्वी इतर तालुक्यात तहसीलदार म्हणून काम करताना देवरे यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप याबाबतचे सर्व अहवाल आमदार लंके यांनी हजारे यांना सादर केले.

लंके यांनी सादर केलेल्या अहवालांचे अवलोकन करून हजारे यांनी “असे अधिकारी तालुक्यात नकोत, वेळ पडली तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन” असे सांगत हजारे यांनी आमदार लंके यांना क्लीन चिट दिली.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button