Life Style

शरीर बळकट बनवण्यासाठी सायकलिंग हा उत्तम व्यायाम , जाणून घ्या

सायकल चालवल्याने लवकर मृत्यू होण्याचा धोका खूप कमी होतो.

benefits-of-cycling-cycling-is-the-best-exercise-to-strengthen-the-body

आपल्या दैनंदिन जीवनात प्रतेकजण निरोगी आणि फिट (Benefits Of Cycling) राहणीसाठी वेगवेगळे रुटीन फॉलो करतात. परंतु अश्याने बऱ्याचदा आपल्याला हवा तसा गुण न आल्यास काहीजण काहीच दिवसांत हे सगळेच सोडून देतात आणि व्यायाम करणेच बंद करतात. तर या सगळ्यावर सायकलिंग हा एक उत्तम व्यायामप्रकार आहे.

सायकल चालवणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशिर आहे. त्यामुळे आपल्या हृदयाच्या स्नायूंवर चांगला परिणाम होतो (Benefits Of Cycling) आणि स्ट्रोक, हार्ट अटॅकसारख्या गंभीर हृदयरोगांपासून आपण बचावले जातो. डिप्रेशन, लठ्ठपणा आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी देखील सायकलिंग अत्यंत फायदेशीर आहे. सायकल चालवल्याने मधुमेहाची लक्षणे कमी होऊ शकतात . लवकर मृत्यू होण्याचा धोका देखील खूप कमी होतो.

संशोधकांच्या सखोल अभ्यासानुसार 5 वर्षांहून अधिक काळ नियमित सायकल चालवण्यामुळे लवकर मृत्यू होण्याचा धोका 35 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. सायकलिंग (Benefits Of Cycling) ही एक एरोबिक प्रक्रिया आहे. सायकल चालवताना हृदय, रक्तवाहिन्या आणि फुफ्फुसे या सर्व अवयवांचा व्यायाम होतो.त्यामुळेच आपल्या शरीरातील ऑक्सिजनची आवश्यकता आणि शरीराचं मुख्य तापमान वाढून इतर प्रक्रिया सुलभ होतात

सायकल चालवताना घ्यावयाची काळजी :

  • डोक्यापासून पायापर्यंत तुमचं शरीर तटस्थ असावे.
  • खांदे अगदी मोकळे सोडावे आणि तुमच्या कानापासून दूर असावेत.
  • हात निवांत आणि खांदे काहीसे वाकलेले असावेत.
  • कोपरांपासून बोटांपर्यंत हात पुढे एका सरळ रेषेत असावेत.
  • गुडघे बरोबर पायाच्या किंवा पेडलच्या वर येत असावेत.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button