Health

Patanjali Ayurved : पतंजली आयुर्वेद कंपनीचे IPO लवकरच बाजारात दाखल होणार

बाबा रामदेव बिग बुल एचयूएलला धक्का देण्याच्या तयारीत

मुंबई : भारतीय कंपनी पतंजली आयुर्वेद (Patanjali Ayurved) स्वतःचे IPO लवकरच बाजारात आणणार आहे. त्याकरीत या कंपनीतील भागीदारांना पुढच्या वर्षाची वाट पहावी लागणार आहे अशी अधिकृत माहिती खुद्द बाबा रामदेव यांनी एका वृत्त वाहिनीला दिली आहे.

patanjali-ayurved-the-ipo-of-patanjali-ayurveda-company-will-be-launched-soon

‘रुची सोया’ (Ruchi Soya) या कंपनीचा IPO बाजारात आणण्या आधी पतंजलीचे (Patanjali Ayurved) IPO बाजारात आणण्याची योजना आखली होती मात्र काही कारणास्तव ते शक्य होऊ शकले नाही. मात्र सर्व अडथळे दूर झाले असून पुढील वर्षी नक्कीच पतंजलीचा IPO बाजारात दाखल होणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती बाबा रामदेव यांनी स्पष्ट केली आहे.

तोट्यात गेलेल्या रुची सोया या कंपनीला पतंजली आयुर्वैदने विकत घेऊन त्यात सुधारणा केली आणि सध्याच्या त्याचे IPO बाजारात आल्याने केवळ 17 रुपये असलेला या कंपनीचा समभाग (शेअर) मागील 6 महिन्यात 1500 रुपयांवर पोहोचला आहे. परिणामी गुंतवणूकदारांना 8900 टक्के इतका मोठा नफा मिळाल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले. या कंपनीचे बाजारमूल्य 32,500 कोटी रुपये इतके आहे.

रुची सोयाचा प्रयोग यशस्वी झाल्याने पतंजली आयुर्वेद (Patanjali Ayurved) कंपनीचा आत्मविश्वास वाढला असून पुढल्या वर्षी पतंजलीचे देखील IPO बाजारात आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पंतजली आयुर्वेद ही कंपनी केवळ आयुर्वैदिक औषधांच्या निर्मितीत कार्यरत होती. मात्र कालांतराने खाद्य पदार्थ विक्रीत आल्याने एक (FMCG) म्हणून उदयाला आली आहे.

परदेशातील हिंदुस्थान युनीलिव्हर या कंपनीसोबत पतंजलीची स्पर्धेत असून त्याला मागे टाकण्याचा निश्चय पतंजलीने केला आहे. पतंजलीचे IPO बाजारात आल्यावर ही स्पर्धा अधिक ताकदीची होऊन भारतातील प्रथम क्रमांकाची कंपनी होण्याचा उद्देश साध्य होईल, असा विश्वास बाबा रामदेव यांनी व्यक्त केला आहे.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button