Health

डेंग्यूला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी मदत करण्याचे आवाहन

कोरोना पाठोपाठ सार्वजनिक आरोग्यापुढे मोठे आव्हान

dengue-prevention-measures-in-panvel-municipal-corporation

पनवेल : कोरोना पाठोपाठ जलजन्य, किटकजन्य रोगांनी सार्वजनिक आरोग्यापुढे मोठे (Dengue Prevention) आव्हान आहे. उपायुक्त सचिन पवार व मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आज (18 ऑगस्ट) झालेल्या वैद्यकिय आरोग्य विभागाच्या बैठकीत प्रामुख्याने जलजन्य, किटकजन्य आजारांस प्रतिबंध करण्यासाठी पालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरती चर्चा करण्यात आली.

जलजन्य, किटकजन्य आजारांस प्रतिबंध करण्यासाठी जन-जागृती होणे महत्वाचे असल्याने महापालिकेमार्फत पालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. स्वच्छ पाण्यात निर्माण होणाऱ्या डासांची मोठी पैदास पावसाळ्यात होत असल्याने किटकजन्य रूग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. यांना रोखण्यासाठी महापालिका करत असलेल्या कामांमध्ये नागरिकांनीही हातभार लावावा असे आवाहन वैद्यकिय आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

जरी पालिका क्षेत्रात डेंगूचे (Dengue Prevention) रूग्ण जास्त आढळून येत नसले तरीही या डेंगूच्या आजाराला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. नागरिकांनी आठवड्यातून केवळ 10-15 मिनीटे आपला वेळ दिल्यास या आजाराच्या मुकाबल्यात पनवेल महापालिका आपला असा वेगळा पॅटर्न तयार करणे शक्य आहे.

गेल्या काही दिवसापासून कोविड-19 ची रूग्ण संख्येचा आलेख उतरताना दिसू लागला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू ,मलेरिया, टायफॉईड, काविळ असे रोग डोके वर काढताना दिसू लागले आहे. यामध्ये डेंगू, चिकनगुनिया या रोगांमध्ये रूग्णांच्या रक्तातील रोगप्रतिकारक पेशी झपाट्याने खाली आल्याने रूग्ण अस्वस्थ होतात. हे रूग्ण गंभीर झाल्यास रूग्णांना दवाखान्यात नेण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही. या उपचाराचा खर्च अवाढव्य असतो.

या आजाराला हद्दपार करण्यासाठी डासांची उत्पत्ती स्थाने शोधून नष्ट करणे गरजेचे असते. डेंगू हा रोग ॲनाफॅलिस प्रजातीच्या डासांपासून होतो. या डासाची मादी प्रामुख्याने स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालते. अंडीतून अळ्यांचे कोष आणि कोषातून डास हे जीवनचक्र अवघ्या 15 दिवसांचे असते. यामुळे हे जीवन चक्र मोडण्यासाठी नागरिकांनी आपल्या घराभोवती अस्वच्छ पाण्याचे साठे राहणार नाहीत, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

विशेषत: पावसाळ्यात (Dengue Prevention) असे साठे मोठ्या प्रमाणत होतात. घरातील किंवा सोसायटीच्या परिसरात असलेली फुटकी भांडी, नारळाच्या करवंट्या निरूपयोगी टायर्स, रेफ्रिजरेटरमधून पाणी बाहेर पडण्यासाठी असलेला टब अशा ठिकाणची स्वच्छता नागरिकांनी वेळचेवेळी केली, तर डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होणार नाही. यासाठी नागरिकांनी आठवड्यातील केवळ 15-20 मिनीटे दिली तरी पुरेशी आहेत. डेंग्यूला हद्दपार करण्यासाठी पनेवल महापालिका प्रयत्न करतेच आहे. आता नगारिकांनी एक पाऊल पुढे टाकत आपली आठवड्यातील 15-20 मिनीटे दिल्यास पनवेल महापालिका आपला एक वेगळे उदाहरण बनवू शकते.

तसेच सर्व खाजगी रुग्णालये, दवाखाने, प्रयोगशाळांमध्ये डेंग्यू, कावीळ, लेप्टोस्पायरॉसीस, हिपटायसिस बी, मलेरिया, टायफॉईडचे पॉझीटिव्ह रूग्ण आढळल्यास ही माहिती तात्काळ त्या त्या क्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास देणे बंधनकारक असणार आहे. सर्व खाजगी रुग्णालये, प्रयोगशाळांना या आधीच पालिकेच्या वैद्यकिय आरेाग्य विभागामार्फत माहिती कळविण्यासाठी ईमेल आयडी (panvelmoh@gmail.com) अवगत करून दिलेले आहेत. विलंब करणाऱ्या रुग्णांलये, प्रयोगशाळांवरती कठोर कारवाई करण्यात येईल.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button