Entertainment

छोट्या पडद्यावर शिल्पा शेट्टीचे पुनरागमन

राज कुंद्रा प्रकारानंतर पहिल्यांदाच या 'शो'मध्ये दिसणार

shilpa-shetty-returns-as-judge-in-super-dancer-season-4

मुंबई : पॉर्न फिल्म प्रकरणात राज कुंद्राला अद्यापही दिलासा मिळालेला नाही आणि 19 जुलैपासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. जेव्हा राज या प्रकरणात अडकला तेव्हापासून शिल्पाने तिच्या व्यावसायिक कामापासून स्वतःला दूर केले होते. (Shilpa Shetty Super Dancer) रिअॅलिटी टीव्ही शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ च्या शूटिंगमध्येही ती जात नव्हती. गेल्या तीन आठवड्यांपासून शिल्पाने कोणतेही शूटिंग केले नव्हते पण आता मात्र शिल्पाने या शोमध्ये परत येण्याचे मन बनविले आहे.

शिल्पा 17 ऑगस्टपासून शूटिंगला परतणार

शोच्या सूत्रानुसार, शिल्पाने (Shilpa Shetty Super Dancer) हा शो सोडला नव्हता, फक्त कौटुंबिक कारणामुळे ती या शो पासून काही काळ दूर राहिली होती. शिल्पाच्या शोमध्ये परतण्याच्या निर्णयाला निर्मात्यांनीही पूर्ण पाठिंबा दिला असून त्यांना शिल्पाच्या जागी दुसरा कोणी सेलिब्रेटी नको होता असेही त्यांनी सांगितले. शिल्पासाठी शूटिंगमध्ये परतणे हा एक मोठा निर्णय होता, त्यामुळे तिला तिचा निर्णय घेण्यासाठी पूर्ण वेळ देण्यात आला. शिल्पा 17 ऑगस्टपासून शूटिंग सुरू करेल आणि शोच्या शेवटपर्यंत ती एक भाग असेल.

शिल्पा गेल्या तीन आठवड्यांपासून शूटिंगवर नव्हती आणि तिच्या अनुपस्थितीत काही सेलिब्रिटी गेस्ट शो केले, ज्यात करिश्मा कपूर, जेनेलिया आणि रितेश देशमुख यांची नावे आहेत. या शोमध्ये अनुराग बासू आणि गीता कपूरही जजच्या भूमिकेत आहेत. राजचे दोन विवाह झाले होते. त्यांचे पहिले लग्न कविता कुंद्राशी झाले. काही वर्षांनी दोघेही वेगळे झाले. यानंतर राजने 22 नोव्हेंबर 2009 रोजी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत – मुलगा वियान आणि मुलगी समीशा.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button